
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांची नवी दिल्लीस्थित त्यांच्या ७ लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी नुकतीच सहकुटुंब भेट घेतली.आदरणीय श्री. शिवराज पाटील चाकूरकर साहेबांसमवेत मा. पंतप्रधानांची झालेली ही सदिच्छा भेट आम्हा सर्वांना ऊर्जा देणारी ठरली. मा. चाकुरकर साहेबांनी लोकसभेचे सभापती असताना केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा मोदीजींनी आवर्जून उल्लेख केला.
या भेटीत त्यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने नवीन संसद भवनाची निर्मिती व व्याप्ती, लोकसभा मतदारसंघाचे होवू घातलेले परिसीमन, महिलांचा राजकारणातील सहभाग, सौर ऊर्जा मिशन, वन नेशन, वन इलेक्शन, महिला सक्षमीकरण यांचा समावेश होता. भारतातील पुरातन मंदिर स्थापत्य, शिल्प, लेण्या ,अफाट निसर्ग संपदा व जैविक विविधता तसेच सांस्कृतिक व लोककलांच्या समृध्द परंपरेला जगासमोर प्रभावीपणे मांडणे व जगभर पर्यटन क्षेत्रात भारताची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी पंतप्रधानाची भूमिका अत्यंत प्रभावी वाटली.

* RTE मधून 10 वी पर्यंत शिक्षण
केंद्र सरकारच्या RIGHT TO EDUCATION कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचे धोरण आहे. याद्वारे इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्येही २५% जागा आरक्षीत आहेत. पण ८ वी नंतर खाजगी शाळेची फीस पालकांना परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थी नववी/दहावी मध्ये त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण पूर्ण करू शकत नाही. तसेच अचानक सरकारी शाळेतही तो एडजस्ट होवू शकत नाही. याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो. याचे होणारे दूरगामी परिणाम याबाबत मी अनेक वर्षांपासून विचार करत होते. ही बाब आदरणीय मोदीजी कडे मांडली. मोफत व सक्तीच्या शिक्षण मर्यादा इयत्ता दहावी पर्यंत लागू करावी, अशी आग्रही विनंती मी त्यांना केली. या संदर्भात मोदी साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.
*आयुष्यमान भारतची वयोमर्यादा 70 पर्यंत
‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ महिलांच्या दुर्लक्षीत आणि उपेक्षीत जीवनात संजीवनी ठरली आहे. तसेच योजनेची वयोमर्यादा ७० केल्याने ग्रामीण भागात ज्येष्ठांना याचा विशेष लाभ होणार आहे. याबाबत मी पंतप्रधानाचे विशेष आभार मानले.

मोदीजींनी रुद्राली, कुशाग्र आणि ऋषिका यांच्यासोबत डिजिटल इंडिया AI in legal field, Youth Participation in Nation Building अशा विषयांवर चर्चा केली.
भगवान सत्यसाई बाबांच्या पुट्टापार्थी आश्रमातील भेटीच्या अनेक जुन्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला. कुशाग्रजींचे शिक्षण NLU गांधीनगर मधे झाले असल्याने गुजरातची चर्चा होणे स्वाभाविक होते. पंतप्रधानांनी उत्तर लंडन स्थित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊस व तेथील स्वतंत्रता संग्रामातील घडामोडी, श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जन्मगावी माण्डवी कच्छ येथे प्रती इंडीया हाऊस ची निर्मिती केली याचा विस्तृत इतिहास सांगितला व आज ते एक मोठे पर्यटन स्थळ बनले आहे हे विशेष नमूद केले.
अनेक पारिवारिक,सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर पंतप्रधानांचे मार्गदर्शनपर चर्चा व विचार साधारण ५५ मिनिटे ऐकणे एक ऊर्जावान आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
आम्ही पंतप्रधानांना लातूर भेटीचे आग्रहपूर्वक निमंत्रणही दिले.
विशेष म्हणजे पंतप्रधान निवासाची नवीन देखणी वास्तू, रचना,मांडलेली प्रत्येक वस्तू, भिंतीची सजावट,पेंटिंग, आसन व्यवस्था आणि रंगसंगती मोदीजींच्या चोखंदळ आवडीनिवडीची साक्ष देत आहेत.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी आम्हा कुटुंबियांना दिलेली ही भेट चिरस्मरणात राहील.
#PM #NarendrajiModi #chakurkarfamily #memories #archanapatilchakurkar

