
लेखन – आनंद कसबेकर, छत्रपती संभाजीनगर
23 मार्च हा शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या स्मृती दिवस. हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला जातो. त्या शहिदांना अभिवादन समाज उपयोगी कृतीने व्हावे यांसाठी सर्वांना देहदान व अवयदानाचा संकल्प करावा आणि त्यासाठी जनजागृती व्हावी याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रत्येक वर्षी 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान देहदान व अवयदान अभियान राबवत असते.
देहदान व अवयदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.
देहदानाचा उपयोग प्रयोगशाळेत डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी तसेच इतरांना जीवनदान देण्यासाठी होतो.
या संदर्भात अनेक शंकांचे व काही समजुतीचे निरसन करण्यासाठी प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांच्या मार्गदर्शनाद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे आपणास पुढील शंका व गैरसमजाचे प्रबोधन व्हावे याकरिता सदरील माहिती देण्यात येत आहे.
देहदान व अवयवदान या विषयावर डॉक्टर सुद्धा अणभिज्ञ आहेत असे वाटावे अशी सध्या समाजात परिस्थिती आहे. जे काम आपल्या मृत्यूनंतर ही कामाला येण्याचे काम अवयव दान एका देहदानाने संशोधक, शल्यचिकित्सक निर्माण होण्यासाठी आवश्यक आहे.
एका देहदानाने 15 डॉक्टर तयार होतात.
देहदान करण्यासाठी शरीररचना शास्त्र विभागातून प्रक्रिया केली जाते ज्यामध्ये देहदान करण्याच्या वारसाची सहमती किंवा सही लागते.
देहदान संदर्भात लोकांच्या मनात शंका आहेत, प्रश्न आहेत.
त्यासाठी माहिती मिळवून शंकांचे निरसन व प्रश्नांचे उत्तर द्यावी लागतात त्यासाठी प्रा. डॉ. सुहास मेश्राम यांचे पुस्तक उपयोगी आहे. ज्यांनी स्वतः कुटुंबासह देहदान करण्याचा संकल्प केला आहे.
आजच्या परिस्थितीमध्ये दहा लाख लोकांमध्ये 0.28% देहदान व अवयव दान केले जाते ते अत्यल्प असे प्रमाण आहे.
अवयव दान करण्याने देहदान होत नाही ही तांत्रिक बाब आहे. समजावण्यासाठी देहदाना मध्ये मृतदेह जतन करण्यासाठी मृतदेहाला मानेच्याद्वारे इंजेक्शन देऊन ते दोन ते अडीच वर्ष मृतदेह चांगला राहते परंतु अवयव दान केलेल्या मृत्युदेहाला असे माने द्वारे इंजेक्शन दिल्यानंतर मृतदेह जतन होण्याची प्रक्रिया होत नाही म्हणून अवयव दान करणाऱ्यांच्या अंत्यविधी त्यांच्या संस्काराप्रमाणे केला जाऊ शकतो देहदान करण्यासाठी संकल्प भरलेच पाहिजे असे नाही. स्मशानभूमी मध्ये घेऊन जाण्याआधी जे विधी करतात ते करण्यात येतात डॉक्टर मृत्यू प्रमाणपत्र देतात त्यानंतर देहदानाची प्रक्रिया केली जाते. यामध्ये देहदान करण्यासंबंधी एक गैरसमज आहे मृतदेहाची हेळसांड होते असे समजतात, तसे होत नसते. कारण, मेडिकलचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना पुस्तकाचा आदर युक्त व्यवहार करतो तसेच आदर युक्त व्यवहार होण्यासाठी मृतदेहाशी आदराने वागण्याचे विद्यार्थ्यांना अवगत केले जात असते नव्हे तशी एक प्रतिज्ञा दिली जाते.
या उलट आपण परंपरेच्या नावाने मृतदेहाला गादीवर झोपणाऱ्याला बांधतो इ. स्मशानभूमी मध्ये विसावा परंपरेने मध्येच खाली ठेवतो (मृतदेह) व नंतर खाली वर लाकड टाकून, वारसाला पेटवायला लावले जाते ही हेळसांड होण्यापासून व मृत्यूनंतर ही उपयोगी येण्याचे काम काहीही न करता केले जाऊ शकणारे काम आहे जे जे माझ्याकडे आहे ते ते लोकांपर्यंत गेले पाहिजे यांसाठी काही उपक्रम.
त्वचा दान,
*मानव-* मनुष्य मेल्यानंतर कुठलेही आजार नसलेला व्यक्ती. देहदान प्रमाणे मृतदेह घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. *पाठीच्या मागचा भाग- एकूण हाताचा पंजा एवढा घेतला जातो* त्याची तपासणी करून साठवून ठेवला जातो.
देशातील बॉम्बस्फोट, जळीत प्रकरण, लहान मुलांचे अपघाती जळीत प्रकरण, गरम पाणी, मजूर किंवा कामगार अपघाती जळीत प्रकरण इत्यादी 40% पेक्षा जास्त जरी जाळले तरी जळणाराचा मृत्यू केवळ जंतुसंसर्गाने होतो. कारण जळलेल्या जागी त्वचा दानातील त्वचा लावल्यास नीट होण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल. कारण,
जळल्यानंतर फोड येतात, वेदना होतात व पट्टी बांधता येत नाही पट्टी बांधून जळल्यांची उपचार करता येत नाहीत, म्हणून त्वचा अंथरूण नवीन त्याच्यावर येण्याची व मृत्यू पासून रोखण्याची शक्यता वाढते.
*नेत्रदान*
मृत्यूनंतर- करता येणारे हे एक असे दान आहे त्यासाठी नेत्रपेढी घरी येतात व नेत्रपटल /कॉर्निया म्हणजेच डोळ्यातील काळ्या भागावरील (लेन्स) आधी जसा दिसत होता तसाच डोळे झाकलेल्या अवस्थेत मृतदेह असतो. देशाला 2.5 लाख अंधाना डोळ्याची गरज आहे. नेत्रदानाने पुढच्या जन्मात आंधळे होते अशी अंधश्रद्धा/ गैरसमज आहे. श्रीलंका मध्ये प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करतो जगातील 66 देशांना नेत्रदानाची गरज भागवतो.
आपण मागणारे – देणारे होऊया.
*अवयव दान* – ठराविक वेळेत करावे लागते. अवयव साठवून देण्याच्या संदर्भात गैरसमज आहेत. तसेच अंतिम संस्कार पर्यावरण पूरक करता येते. शासनच लाकडे पुरवते एका मृत्युदेहाच्या अंत्यविधीसाठी दोन झाडे लागतात. यांमध्ये तांत्रिक अडचण अपवाद वगळता विवेकाचा/सदसदविवेक बुद्धीचा वारसा सांगणाऱ्यांनी तरी करावयास काय हरकत आहे.
स्मशानामध्ये रक्षा दफन केली व वृक्ष लागवड केली आपल्या सोयीने अस्थिवर झाड लावणे हा विचार फक्त विचार न राहता कृतीशील व्हावे लागेल व अधिकाधिक माहिती मिळवून यासंबंधीचे गैरसमज व प्रश्नांची उत्तरे पुस्तकांमधून व्याख्याना द्वारे मिळवावी लागतील. या सप्ताहातील उपक्रम आपल्या विभागातील अंधश्रद्धा निर्मूलन केंद्राद्वारे साजरा करूया!!!

