
..लातूरच्या आदर्श कॉलनीतील कम्युनिटी हॉल या ठिकाणी दि. २० व २१ रोजी "जिल्हा शासकीय ग्रंथोत्सव 2024" संपन्न झाला. या ग्रंथोत्सवात "लातूरची साहित्य संस्कृती" या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. सोमनाथ रोडे, प्रमुख वक्ते म्हणून माझ्यासह जयप्रकाश दगडे, डॉ. जयद्रथ जाधव, धनंजय गुडसूरकर हे उपस्थित होते. तसेच या ग्रंथोत्सवाच्या आयोजक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीम. वंदना काटकर या उपस्थित होत्या.
परिसंवादातील वक्ता या नात्याने याप्रसंगी मी इतिहास काळातील साहित्य-संस्कृती यावर प्रकाश टाकला.

लातूर जिल्ह्याची साहित्य संस्कृती ही शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखितांच्या माध्यमातून चौदाशे वर्षापूर्वी पर्यंत जाते हे विशेष…

