वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी वीजग्राहकांनी त्वरीत वीज बील भरावे, महावितरणचे आवाहन
लातूर, दि.२८ मार्च : महावितरण समोरील सध्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि थकबाकी वसुलीची गंभीर गरज लक्षात घेता, २९, ३० आणि ३१ मार्च २०२५ या सुट्टयांच्या काळातही महावितरणची सर्व वीजबील भरणा केंद्र कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा थकीत वीजबील असलेल्या ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन महावितरणने केले आहे.
आर्थिक वर्ष संपत असताना, महसूल संकलन जास्तीत जास्त करण्यासाठी आणि कंपनीची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सुटटीच्या दिवशीही थकीत वीजबील जमा होणे महत्त्वाचे आहेत. थकबाकी वसूल करण्याचे महत्त्व लक्षात घेता, सर्व संबंधित कार्यालयांना २९,३० आणि ३१ मार्च या तारखांना सर्व वीजबील भरणा केंद्र सुरू ठेवण्यासाठी आवश्यक सूचना जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महावितरणचे मोबाईल ॲप, मोबाईल वॉलेट तसेच ऑनलाईन असणाऱ्या विविध पर्यायांचा वापर करत वीज ग्राहकांनी आपल्या थकीत व चालू वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे तसेच उन्हाळ्याच्या काळात वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी त्वरीत वीजबील भरावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

