रंगपंचमीच्या दिवशी (१९ मार्च सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास औसा रोडवरील वासनगाव रोड वरून भावेश संतोष तिवारी (वय २० रा. हमाल गल्ली, लातूर) हा आई सोबत दुचाकीवर निघाला होता. तेव्हा वासनगाव पाटी येथे दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या मोटारसायकलची धड़क बसली.
भावेषच्या मेंदूला मार लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मात्र, तीन दिवसानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने इतरत्र हलविण्याचा सल्ला डॉक्टरानी
दिला.नंतर भावेषला हैदराबाद येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रेनडेड झाल्याचे डॉव्टरांनी कुटुंबियांना सांगितले .आई अरूणा तिवारी, वडील संतोष तिवारी यानी आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गुरूवारी भावेषच्या दोन्ही किडनी, लिव्हर, हार्ट, डोळे अवयवदान करण्यात आले. त्यामुळे इतर सहा जणांचे आयुष्य फुलले आहे.लातूर शहरातील नांदगाव वेस स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी १० वाजता भावेषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

