माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमीत देशमुख यांचा समावेश
लातूर दि. २.
राज्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५- ३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलने २१ जागेसाठी २१ जणांचे नामनिर्देशन फॉर्म जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर येथील कार्यालयात जिल्हा उपनिबंधक श्री बदनाळे यांचेकडे मंगळवारी दाखल केले असून पॅनल कडून अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांत राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी तथा विद्यमान कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैधकीय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासरावजी देशमुख यांचा समावेश आहे
अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे घेतलें दर्शन
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी स्थापन केलेला हा मांजरा साखर कारखाना सलग ४० वर्षापासून सुरू आहे या भागातील शेतकऱ्यांना लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा आठवण कायम आहे त्यामुळेच नामनिर्देशन फॉर्म भरण्या अगोदर जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पॅनलच्या सर्व उमेदवारांनी अभिवादन केले व आशिर्वाद घेतले यावेळी शहर जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख , कोंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विधि आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड प्रवीण पाटील जिल्हा कोंग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, जिल्हा कोंग्रेसचे मीडिया समन्वयक हरिराम कुलकर्णी शशिकांत कदम, जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील,विरसेन भोसले, संभाजी भिसे, धनंजय भिसे विश्वनाथ बिराजदार, उदयसिंह देशमुख, रमेश देशमुख, संभाजी रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
शेवटच्या दिवशी लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलच्या खालील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यात माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख,(बाभळगाव) माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख(बाभळगाव) नीलकंठ बचाटे, (टाकळी सी) सचिन शिंदे (सावरगाव) दयानंद बिडवे ( मुरुडअकोला) तात्यासाहेब देशमुख (पाखरसांगवी) धनराज दाताळ (बोकनगाव) ज्ञानेश्वर पवार (साई) वसंत उफाडे (टाकळी ब) अशोक काळे (चिकुर्डा) कैलास पाटील (रुई) मदन भिसे (गादवड) नवनाथ काळे (बोरगाव) पठाण शेरखा (आंदोरा) श्रीशैल्य उटगे (कवठा) सदाशिव कदम (लखनगाव) चांमले निर्मला विलास (धनेगाव) छायाबाई अरुण कापरे (जोडजवळा) दरकसे अनिल (जेवळी) शंकर बोळंगे (भातांगळी) बाळासाहेब पांढरे (मुरुडअकोला) यांचा समावेश आहे
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आशियाना निवासस्थानी उमेदवारांनी घेतली सदिच्छा भेट
लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलचे प्रमुख आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना निवासस्थानी पॅनल चे सर्व उमेदवारांनी सदिच्छा भेट घेतली संवाद साधला यावेळी दिलीपराव देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या

