
सामाजिक कार्य हे केवळ निवडणुकीपुरतं नको, किंवा खासदारकीच्या खुर्चीपुरतं मर्यादित नको – हे विधान आज लातूर जिल्ह्यातील जनतेचं ठसठशीत मत बनलं आहे. कारण माजी खासदार सुधाकर शृंगारे हे केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर महापुरुषांच्या जयंती, धार्मिक उत्सव, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम अशा प्रत्येक प्रसंगी स्वतःच्या उपस्थितीने त्या कार्यक्रमांची शान वाढवत आले आहेत. हीच त्यांची कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
परंतु सध्या जिल्ह्यातील जनतेच्या मनात एक प्रश्न आहे – “ही ऊर्जित, सजग उपस्थिती कायमची राहणार का?”
कारण श्रंगारे साहेबांचा समाजाशी असलेला आत्मीय संबंध हा निवडून येण्यासाठीचा राजकीय तंत्र नाही, तर समाजसेवेचा एक ठाम संकल्प होता. हीच त्यांची भूमिका जर सातत्याने दिसली नाही, तर जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची भीती आहे.
शंकर शृंगारे सारखी जागतिक संकल्पना देणारी तरुण प्रतिभा दूर कशी झाली?

आपले सुपुत्र सिनेस्टार शंकर शृंगारे , ज्यांच्याकडे जगभरात नाव मिळवण्याची ताकद आहे, असे युवा कलावंतही सध्या लोकांपासून दूर असल्याची खंत लातूर जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या संकल्पना, उपक्रम, कला आणि ऊर्जा जर लातूरसारख्या जिल्ह्यातूनच गायब झाली, तर ती जिल्ह्यासाठी हानीकारकच!
समाजासाठी राजकारणात आलो, तर समाजात कायम राहिलं पाहिजे
श्रंगारे साहेब, तुम्ही राजकारणात स्वार्थासाठी नाही, समाजासाठी आला आहात, ही भावना आजही जनतेच्या मनात जिवंत आहे. पण ती भावना टिकून राहण्यासाठी तुमचं सातत्य समाजकार्याच्या रस्त्यावरही चालत राहणं आवश्यक आहे.
लातूरच्या जनतेची एकच विनंती:
तुम्ही राजकारणात सक्रिय राहा किंवा न राहा, पण समाजात तुमचं स्थान हे दीपस्तंभासारखं राहिलं पाहिजे.
तुमचं अनुभव, तुमचं नेतृत्व, आणि तुमची उर्जाच जिल्ह्याला आवश्यक आहे. तुमचं समाजाशी नातं राजकीय पदाच्या आधारावर नसून, हे हृदयाशी जोडलेलं आहे.
आज प्रत्येक नागरिकाच्या मनातील एकच आग्रह आहे –
“श्रंगारे साहेब, पुन्हा जनतेत या… समाजासाठी पुन्हा पुढे या!”
– संपादक दिपरत्न निलंगेकर दै युतीचक्र ,लातूर

