
लातूर | विशेष प्रतिनिधी
‘स्मार्ट सिटी’चं स्वप्न दाखवणाऱ्या लातूर महापालिकेची स्वतःची इमारतच पाणी सोडतेय!
भर उन्हाळ्यात, वरच्या मजल्यावरील बाथरूममधून थेंब-थेंब पाणी खाली पडतंय, आणि रांगेत उभ्या नागरिकांच्या अंगावर ‘सिस्टमची थंडी’ आणि ‘बदनामीचं पाणी’ पडतंय.
अधिकाऱ्यांचं मात्र वेगळंच गणित – एसीच्या आरामदायक कार्यालयातून बाहेर डोकवायलाही वेळ नाही.
आयुक्त आणि उपायुक्त साहेबांसाठी कदाचित ही गळती सामान्य असेल, पण लोकशाहीच्या मंदिरात असा गळका प्रशासनाचा चेहरा पाहून नागरिक चकित झालेत.

‘पाणी टंचाईचं गारुड’ असलेल्या लातूरमध्ये, महापालिकेच्या इमारतीतच अशी पाण्याची उधळपट्टी – हे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणं नाही का?

राजकीय वर्तुळातही कुजबुज सुरू – “जनतेसाठी सध्या काळया पिवळ्या पाण्याची शिक्षा सुरू असताना ही कुठल्या योजनांचं पाणी थेंब थेंब टपकतंय, पण इमारतीत मात्र ‘गॅलन’भर गळतंय!”

एकीकडे विकासाच्या गप्पा, आणि दुसरीकडे गळक्या छपऱ्याखाली उभा नागरीक – हीच का आपली ‘सुशासन’ यंत्रणा?
आता या विषयावर कोण बैठक लावली तर लगेच दुसरे रस्तावर आंदोलन करतील… जनतेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासाठी कुठलेही राजकारणी प्रयत्न करणार नाहीत जसे “लातूर जिल्हा रुग्णालयाचे झालं” तसेच हे चालत राहणार…!!!

