
लातूर – शरद पवार यांच्यापासून विभक्त होऊन स्वतंत्र पक्ष स्थापन करणाऱ्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातुरात आले… पण त्यांची पत्रकार परिषदचे बहुतेकांना अनेक पत्रकारांना निरोपच नसल्याने ते आले कधी गेले कधी याची पत्रकार आपसात माहिती घेण्यातच दंग होते ! कारण पक्षाचे शहरात कार्यालयच नाही आणि पत्रकारांना कोणताही अधिकृत निरोप देण्याची तसदी घेतली गेली नाही.
एकीकडे महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्ष संघटनाची स्थिती इतकी ढासळलेली की पत्रकार परिषदेसारख्या कार्यक्रमालाही नीट निरोप पोहचविण्याची यंत्रणाच आज अस्तित्वात नव्हती एक माजी मैत्री एक विधमान मंत्री जिल्ह्यात असून आज प्रदेश आध्याच्या पत्रकार परिषदेचे निरोप वेळेत सर्वच पत्रकारांना देऊ शकले नाहीत ! काही कार्यकर्त्यांनी काही निवडक पत्रकारांना फोन केला, तेवढंच. ई-मेल, अधिकृत निमंत्रण काहीच नाही.
प्रदेशाध्यक्ष तटकरे आले, पत्रकार परिषदही झाली, पण याची माहिती शहरातील अनेक पत्रकारांना नव्हती ते आपसात फोन करून वेळ घेतील तोपर्यंत पत्रकार परिषद सुरू झाली. काही जण धावपळ करत पोहोचलेही, पण एवढ्या मोठ्या पदावरचा नेता येतो आणि प्रसारमाध्यमांना साधा निरोपही दिला जात नाही, हे आश्चर्यकारक!
या गोंधळलेल्या कारभारामुळे लातूरमधील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “नेते गुपचूप यायचे, आपल्याच माणसांनाच निरोप द्यायचा, आणि मग छापून यायला अपेक्षा ठेवायची” – अशा शब्दांत अनेकांनी संताप व्यक्त केला.
राज्यात मोठी ताकद गाजवणाऱ्या पक्षाचे लातूरमधील हे ‘गुप्त संघटन’ कधी सुधारेल की मागे खेळ पदाधिकारी नेत्याचाच पक्ष कार्यकर्ता कुठे आहे असा म्हणून हिणवलं जाणारा एक माजी मंत्री एक विद्यमान मंत्री असताना देखील केव्हा मजबूत होणार की असेच चालत राहणार , हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय!

