जळकोट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
जळकोट दि 26
शेतातील उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या बोरगाव खूर्द (ता जळकोट) येथील एका तरुण शेतक-याचा उच्च दाबाची विद्युत वाहिनी अंगावर पडल्याने वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविकांत दतात्रय केंद्रे वय 30 वर्षे रा. बोरगाव खु ता. जळकोट असे या घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे. उप जिल्हा रुग्णालय, उदगीर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शितोळे यांनी खबर दिल्यावरून आकस्मिक मृत्यूचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आकस्मिक मृत्यूची घटना दि. 24 रोजी रात्री 22.20 वा. चे सुमारास सरकारी दवाखाना उदगीर येथे उघडकीस आली आहे. रविकांत केंद्रे यांना ता. 24 रोजी सायंकाळी स्वतः च्या शेतात वीजेचा धक्का लागला होता. उपचारासाठी त्यांना उदगीर येथे नातेवाईकांनी दाखल केले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या आकस्मिक मृत्यूची नोंद आज ता 25 एप्रिल रोजी सायंकाळी 17.38 वाजता पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार शिवानंद नागुरे यांनी हा आकस्मिक मृत्यू दाखल करुन घेतला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे लक्ष्मण नागरगोजे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

