पावसाचे वातावरण होताच वीज गुल
काही भागात अवकाळी पाऊस
जळकोट तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी;
फळबागांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना फटका

लातूर दि. २६(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काही भागात आज अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. अहमदपूर, उदगीर, चाकूर , जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.
कडक उन्हाचे चटके, अंगातून वाहणा-या घामाच्या धारा यांनी त्रस्त झालेल्या जळकोट तालुकावासियांना आज थोडासा दिलासा मिळाला. सायंकाळच्या वेळी अचानक आभाळ भरुन आले आणि हलकासा पाऊस सुरू झाला. पाऊस येण्यापूर्वी ढगांचा गडगडाट झाला आणि सोसाटय़ाचा वारा वादळासह सुटला ज्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून आंब्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे. या अवकाळीने शेतक-यांना फटका बसला आहे. आंब्यासह इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळी पिकांनाही फटका बसला आहे. शहर व तालुक्यात केशर आंबा ऐन भरात आला असताना वादळासह पाऊस येत असल्याने दुष्काळग्रस्त व डोंगरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
41मिनिट वाऱ्या व मेघगर्जने सह जोरदार अवकाळी पाऊस
वाढवणा बु येथे शनिवार रोजी सकाळ पासुन उन्हा मुळे तीव्र उष्णता जाणवत होती सायंकाळी 5-20 वाजता पासुन तुफान वारा मेघ गर्जनेसह 41 मिनिट जोराचा पाऊस पडला पावसामुळे उन्हाची दहकता कमी झाल्या मुळे उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला मात्र वारा सुटल्या मुळे जसे पावसाचे थेंव सुरु झाले की विज बंद करण्यात आली.
रस्त्यावरून नाल्यातून दुर्गधी युक्त काळे पाणी वाहाताना दिसत होते.

रेनापुर परिसरात पाच वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित होता. ढगाळ वातावरण होते . सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे.पानगाव मध्ये मुसळधार पाऊस झाला असुन विज पुरवठा खंडित झाला आहे.
अहमदपुर व परिसरात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस चालू असून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे . वडवळ नागनाथ परिसरात वाऱ्यासह पाऊस झाला.

