
महापारेषणच्या उपकेंद्रातील दुरूस्ती व देखभालीचे काम
लातूर : महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब उपकेंद्रातील देखभाल व दुरूस्तीच्या कमाकरिता तसेच उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्यासाठी शहरातील उत्तर परिसराला वीजपुरवठा होणाऱ्या ३३/११ केव्ही आर्वी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा रविवार दि.११ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घ्यावी असे महावितरणने कळवले आहे.
साईबाबा वीजवाहिनीवरील धायगुडे नगर, सह्याद्री अपार्टमेंट, कृष्णाई अपार्टमेंट, दत्तसहवास सोसायटी परिसर, स्वामीसमर्थ वीजवाहिनीवरील सोहेल नगर, सूळ नगर, केशव नगर, विक्रम नगर श्याम नगर, रामजी सुभेदार नगर, अग्रोया नगर, स्वामी समर्थ नगर,इंडिया नगर, एलआयसी ऑफिस भाग, ११ केव्ही द्वारका वीजवाहिनीवरील शारदा नगर, रेणुका नगर, व्यंकटेश नगर, गोरक्षण, मणियार नगर, टाके नगर, कल्पना नगर, कैलास नगर, जटाळ हॉस्पिटल भाग, श्रमसाफल्य सोसायटी, एसपी ऑफिस, मथुरा सोसायटी, संजय क्वालिटी भाग, केशवराज शाळा भाग, नवीन रेणापूर नाका ते शिवाजी चौक जाताना उजव्या हाताच्या भाग तसेच गंगासागर वीजवाहिनीवरील बुरहाण नगर, मळवटी रोड, गंगासागर रेसिडेन्सी, शांताई मंगल कार्यालय, शारदा नगर वीजवाहिनीवरील भिसेन नगर, रामचंद्र नगर, व्यंकटेश नगर, अजिंक्य सिटी, मा बाप कॉलनी, मयुरबन सोसायटी, मधुबन मैत्री पार्क, प्रयागबाई कॉलेज भाग, बालाजी मंदिर भाग, जुना रेणापूर नाका परिसर, मेडिकल वीजवाहिनीवरील बनसोडे नगर, काशिलीन्गेश्वर नगर,देवगिरी नगर,भक्ती नगर, तिरुपती नगर, होळकर नगर,पठाण नगर,नंदधाम सोसायटी,आर्वी गाव,साई रोड सर्व भाग,चांदतारा मज्जीद सर्व भाग,डॉक्टर कॉलनी परिसर तसेच साई वीजवाहिनीवरील सर्व परिसराचा वीजपुरवठा रविवारी दि.११ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापसून दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहील.
आर्वी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
खंडीत वीजपुरवठयाबाबत सनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६२०२१ या मोबाईल क्रमांकावर २४ तास तसेच १९१२, १८००२१२३४३५ व १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

