
लातूर, दि.९ मे : महावितरणच्या लातूर मंडलाच्या अधीक्षक अभियंता पदाचा पदभार प्रशांत दाणी यांनी शुक्रवारी (दि.९मे) स्विकारला. यापुर्वी ते कल्याण परिमंडलांतर्गत येणाऱ्या विरार विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंतापदी कार्यरत होते. अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांची प्रशासकीय बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागी प्रशांत दाणी हे पदोन्नतीवर रूजू झाले आहेत.
अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी हे १९९९ मध्ये तत्कालीन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून मालेगाव (जि. नाशिक) येथे रुजू झाले होते. महावितरणमधील २५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता अशा विविध पदांवर नाशिक,ठाणे,जळगाव,अकोला जिल्ह्यांत तसेच सांघिक कार्याल, भांडूप येथे उल्लेखनीय काम केलेले आहे. नुकतीच त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती होऊन लातूर मंडलात नियुक्ती झाली आहे. राज्यातील विविध शहरी भागासह ग्रामीण भागात काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आहे. जिल्हयातील सुरळीत वीजपुरवठा व ग्राहकाभिमुख सेवा देण्यास प्राधान्य राहील असे श्री. दाणी पदभार स्विकारताच म्हणाले. त्याचबरोबर वीजग्राहकांनीही आपले वीजबील नियमीत व वेळेवर भरावे असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.

