
लातूर | दिनांक २८ मे २०२५ — महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे व इतर पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अन्यथा लातूर शहरात भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.

या निवेदनात, मनसेसह काँग्रेस, भाजप, शिवसेना (उबाठा गट), छावा, संभाजी सेना, लष्करे ऐ भीमा, लोकनायक संघटना इत्यादी विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे आपली भूमिका मांडली.
मनसेच्या दि. १९ मे २०२५ रोजीच्या निवेदनानुसार, लातूर शहरातील विनापरवाना सुरू असलेल्या नारायणा ई टेक्नो स्कूलविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दि. १७ मे २०२५ रोजी मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. संतोष नागरगोजे हे आंदोलनस्थळी उपस्थित नसतानाही, त्यांच्यावर व इतर कार्यकर्त्यांवर खंडणीसारखे गंभीर पण खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
संतोष नागरगोजे यांनी गेल्या महिनाभरात लातूरमधील अवैध धंद्यांविरोधात समाज माध्यमांतून पुरावे सादर करत मोहीम राबवली होती. त्याचा राग मनात ठेवूनच संबंधित पोलीस निरीक्षक सागर यांनी हे खोटे गुन्हे दाखल करून राजकीय कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा डाव आखल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी नारायणा ई टेक्नो स्कूलविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले असतानाही, पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट बोगस शाळेच्या मुख्याध्यापकाच्या खोट्या तक्रारीवर आधारित, कोणताही पुरावा नसताना खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
- संतोष नागरगोजे व इतरांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
- दोषी पोलीस निरीक्षक सागर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
- नारायणा ई टेक्नो स्कूलवर कायदेशीर कारवाई करून शाळेचे संचालक व मुख्याध्यापक यांच्यावर फसवणुकीचा (IPC 420) गुन्हा दाखल करण्यात यावा.
या मागण्या पुढील आठ दिवसांत मान्य न झाल्यास, लातूर शहरात सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर खालील मान्यवरांची स्वाक्षरी व उपस्थिती होती:
अभय साळुंखे (काँग्रेस), विजयकुमार घाडगे (छावा), सुनील बसपुरे (शिवसेना – उबाठा गट), धनराज साठे (भाजप), योगेश देशमुख (संभाजी सेना), संजय राठोड, वाहेद शेख, सचिन शिरसागर, मनोज अभंगे, संग्राम रोडगे, अंकुश शिंदे, भागवत शिंदे, बजरंग ठाकूर, रणवीर उमाटे, बालाजी पाटील, बाळासाहेब मुंडे, सय्यद विक्रम, रवी सूर्यवंशी, गुणवंत पाटील (शिवसेना), रणवीर सुरवसे (लष्करे ऐ भीमा), राज शिरसागर (काँग्रेस), बालाजी जाधव (शिवसेना), जहांगीर शेख, माधव क्लमुकले, वैजनाथ लहाने, अमोल कांदे, श्रीराम माने, महादू रसाळ (लोकनायक संघटना), बंटी गायकवाड, सुनील सौदागर, मुख्तार शेख, सिद्धू माने इत्यादी.

