
जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने पर्यावरण कार्यासाठी प्लास्टिक निर्मूलन ,वृक्षारोपण, कापडी पिशव्यांचा वापर, सार्वजनिक वाहतुकीचा वापर यासाठी पाचही संस्था सरसावल्या.
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्री देवराई ,लातूर वृक्ष चळवळ, चैतन्य हास्य मंडळ, सनराईज योगा स्टुडिओ आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने औसा रोड या मुख्य रस्त्यावरील आणि या परिसरात उभे केलेल्या ऑक्सिजन झोन मधील तूट भरून काढण्यासाठी वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.

हे वृक्ष जगवण्याची हमी एक झाड एक दुकानदार , एक व्यक्ती यांना दत्तक देऊन हया वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सह्याद्री देवराई लातूर वृक्ष चळवळीचे मुख्य समन्वयक सुपर्ण जगताप म्हणाले

देशात अनेक शहरातील हवेमध्ये प्लास्टिकचे अनेक नॅनो कण आहेत. ते आपल्या फुफसाद्वारे रक्तात आईच्या दुधात जायला वेळ लागणार नाही. या बरोबरच
कार्बन उत्सर्जन कमी केले तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिवस साजरा होईल.
पर्यावरण दिन एक दिवसासाठी न करता निसर्ग, ब्रम्हांड हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे म्हणून आपल्या दैनंदिन जगण्तूयान पर्यावरण पूरक कृती स्वीकारावीच लागेल. आपण एक लिटर पेट्रोल डिझेल वाचवले तर सव्वा दोन किलो कार्बन co2 हवेत मिसळण्यापासून रोखू शकतो. एक किलो वॅट म्हणजे एक युनिट वीज जर वाचवली तर आपण 0.8% कार्बन हवेत मिसळण्यापासून वाचवू शकतो.
एक किलो गॅस सिलेंडर वाचवला तर ०.२ टक्के कार्बन उत्सर्जन रोखू शकतो.

फक्त झाड लावणे म्हणजे पर्यावरण दिवस नव्हे तर आपल्या जगण्यामधून कार्बन उत्सर्जन कमी करणे आपण स्वतः कार्बन शून्य आहोत का नाही हे तपासणे, अश्या अनेक छोट्या गोष्टी पासून आपण पर्यावरण पूरक निसर्ग संवर्धनाचे कार्य करू शकतो पण आपल्याला अशी जीवनशैली अवलंबावी लागेल. अन्यथा मानवी वसाहती पृथ्वीवरून नष्ट होण्याची सुरुवात झालेलीच आहे. आपण आज जर विचार नाही केला तर आपण पृथ्वीवरील मानवी वसाहती कधीच वाचवू शकणार नाही.
यावेळी कवी लेखक अरविंद जगताप यांची वृक्ष प्रतिज्ञा सगळ्यांनी सामूहिकपणे म्हटली आणि सर्व संस्थांच्या वतीने औसा रोडवर वृक्षारोपणाचा शुभारंभ देखील करण्यात आला.
या कार्यक्रमाला वृक्ष समन्वयक सुपर्ण जगताप , अँड कालीदासराव देशपांडे, माधव बावगे , गादगीने सर ,अमृत सोनवणे, कैलास पंडित , आकाश गायकवाड, अजहर शेख, व सर्व सामाजिक संस्थांचे सहकारी सदस्य पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
यावेळी वडाच्या नावानं चांगभलं पिंपळाच्या नावानं चांगभलं घोषणामुळे सकाळच्या वेळी सगळे वातावरण उत्साही सकारात्मक झाले होते.

