
लातूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग, लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सभागृहात आज अभिवादन व ग्रंथवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांना ग्रंथ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मोतीपवळे सर यांनी आपले विचार व्यक्त करत शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरकारी वकील अॅड.संतोष देशपांडे होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपात ग्रंथ वाचावे असे प्रतिपादन करीत उपस्थितांचे आभार मानले.

सदरील कार्यक्रमात जिल्हा वकील मंडळाचे सचिव अॅड.गणेश गोजमगुंडे, सहसचिव अॅड.निलेश मुचाटे, ग्रंथालय सचिव अॅड.प्रणव रायचूरकर, कोषाध्यक्ष अॅड.गणेश कांबळे, अॅड.उदय गवारे, माजी जिल्हा सरकारी वकील अॅड.जांबूवंतराव सोनकवडे, अॅड.शिवकुमार बनसोडे ज्येष्ठ विधिज्ञ,अॅड.पांडुरंग ढगे, विशेष सहायक सरकारी वकील(अट्रोसिटी)अॅड.लक्ष्मण शिंदे,अॅड.राम केंद्रे,अॅड.प्रशांत गायकवाड,अॅड.राम गजधने व सर्व पदाधिकारी तसेच लातूर जिल्ह्यातील वरिष्ठ वकील उपस्थित होते.
यावेळी जयंतीनिमित्त ज्येष्ठ वकील,नोटरी वकील बांधवांना व परिसरातील पक्षकार यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.शिवकुमार बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड.सचिन कांबळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अॅड.ननावरे यांनी केले.

