छत्रपती शाहु महाराज यांच्या १५१व्या जयंती निमित्त जेष्ठ नागरीक विचारमंचा चे वतीने आजडाॕ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन छत्रपती शाहुमहाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक हालगी च्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.मिरवणुकीचा समारोप छ. शाहुमहाराज चौक येथे शाहु महाराजांना पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर पु. भिक्खु पय्यानंद थे म्हणाली सामाजिक न्यायाचा व समतेचा विचार शाहु महाराजांनी रुजवला. या विचारामुळेच शाहु राजे महान आहेत तोच समतेचा व सामाजिक न्यायाचा विचार या काळात रुजवणे गरजेचे आहे म्हणुन भारत सरकारने छत्रपती शाहु महाराजांना भारत रत्न देवुन गौरविण्यात यावे आशी आग्रही मागणी करत आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सेवानिव्रुत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शाक्य संघा तर्फे छत्रपती शाहुमहाराजांना सलामी देण्यात येवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी जेष्ठ नागरीक संघाचे सुर्यभान लातूरकर ,केशव कांबळे ,त्र्यंबक कवठेकर ,गौतम चिकाटे ,भरत कांबळे ,दिगंबर गायकवाड ,दुष्यंत आंगरखे ,प्रेमनाथ आंकुशे ,राघु शिखरे,दामु कोरडे व शाक्यसंघाचे शाहुराज कांबळे ,दिलीपराव कांबळे ,मोहन कांबळे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्र संचलन केशव कांबळे यांनी केले.

