
बालविवाह न करता मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा पालकांना नाटिकेतून जाहीर निवेदन.
रेणापूर- प्रतेक पालकांनी आपल्या मुलींचा बालविवाह न करता उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्नाचा विचार करावा तसेच कोणतेही बालक शाळा चालू असताना पालकांनी शेतकामासाठी किंवा इतर कामासाठी पाठवू नये,अभ्यास प्रक्रियेचे नुकसान होते म्हणून शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा पालकांना सल्ला बिटरगाव येथील आयोजीत केलेल्या किशोरींनी कलापथकातून दिला.

ग्रामीण भागातील बालविवाहाचे प्रमाण कमी व्हावे ,मुली बालविवाह नाकारुन शिक्षणाच्या प्रवाहात रहाव्यात ,म्हणून नुकताच रेणापूर तालूक्यातील बिटरगाव येथे कलापंढरी संस्थेच्या पुढाकारातून किशोरी मुलींच्या कलापथकाच्या माध्यमातून बालविवाह,बालमजूरी,प्रतिबंधासाठी पालक जण जाग्रती कार्यक्रम घेण्यात आला.
कलापंढरी सामाजीक संस्था गेल्या ३८ वर्षापासून बालकांना न्याय व त्यांचे हक्क मिळावेत म्हणून बी. पी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.

रेणापूर तालूक्यातील बिटरगाव येथे येथे नुकताच दिनांक २९ जून रोजी कलापंढरी संस्थेच्या वतीने सामूहिक जन जागृति साठी किशोरी कलापथकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिटरगाव च्या उपसरपंच सौ. अनुसया गाडे होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन वंचीत बहुजन आघाडीचे रेणापूर तालूका संघटक क्रष्णा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून राजाभाऊ गाडे, शालेय समिती अध्यक्ष गोपाळ आलापुरे,ग्रामबाल संरक्षण समितीच्या शालू साके,मंगल धुळे,अनिता महाके,सुमिञा साखरे आदींची,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर बालकलापतकाच्या मुलींनी विविध उपक्रम सादर केली,या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीचा बालविवाह न करता तीच्या पायावर उभे राहण्यासाठी पदवीपर्यंत शिक्षणाच्या प्रवाहात ठेवावे, तीच्या आवडीच्या क्षेत्रात तीला करीअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे,बालविवाह न करता, तसेच तीला बालमजूरी ला न पाठवता शिक्षणाच्या प्रवाहात ठेवल्यास नक्कीच मुलगी तीच्या आवडत्या क्षेत्रात करीअर करुन ती तीच्या पायावर उभी टाकते ,फक्त तीला पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, जे पालक आपल्या मुलीचा बालविवाह करतील त्यांना होणारी कायद्याने सजा पालकांना भोगावी लागेल. बालमजूरी ला पाठवलेल्या पालकांवर आणि बालमजूरी करुन घेणाऱ्या वर कारवाई केली जाईल. बालमजूरी करुन घेणाऱ्या मालकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल , या विषयी विविध नाटीकेतून पालकांना संदेश देण्यात आला होता, बालविवाह, बालमजूरी, प्रतिबंधात्मक न्रत्यातून पालकांची जण जाग्रती करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी कलावंतांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर गालफाडे यांनी केले तर सुञसंचलन आसमा शेख तर आभार धनराज पवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज पवार,जयवंत जंगापल्ले,मधुकर गालफाडे, सुप्रिया रामदासी,शालूताई,साके,राजू गोरे,सुप्रिया गोरे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी , महीला, पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

