
- सेवानिवृत्त गटविकास अधिकारी श्री वाघमारे
लातूर, दि.२९, छत्रपती राजर्षी शाहू महाराजासारखे ज्ञानी, न्यायी व समतावादी राजे आम्हा भारतीयांना बौद्धिकदृष्टया पेलले नाहीत, अशी खंत भावी इतिहासाने नोंदवू नये याची विशेष काळजी, आपल्या अभ्यासकासह सर्व समाज बांधवांनी घेतली पाहिजे, असे मत सेवानिवृत्त गट विकास अधिकारी तथा प्रा. श्री वसंतराव वाघमारे यांनी व्यक्त केले. जय भारत प्रभाती मित्र परिवाराच्यावतीने, शाहू जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाषणात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एक सिद्धहस्त लेखक प्रा. रामकिशन समुखराव हे होते.
मनपाच्या लातूर येथील रा. शाहू महाराज उद्यानामध्ये महाराजांच्या जंयती निमित्याने २६ व २९ जून रोजी सामूहिक अभिवादन, व्याख्यान, गुणवंत ज्येष्ठ कुस्तगीरपट्टू तथा कार्यकर्त्यांचा गौरव आणि वृक्षारोपन असे दोन दिवस स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आले. प्रथमतः शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना ज्येष्ठ उपासक प्रा. वसंतराव वाघमारे पुढे म्हणाले की, महाराजांच्या जैन बोर्डिंग मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण घेत होते. त्या च दरम्यान तेथे एस सी मुलांसाठी पण एक स्वतंत्र बोर्डिंग काढली गेली. आणि त्या उद्घाटनासाठी, तत्कालीन मुंबई गव्हर्नरच्या कन्या क्लर्क यांनी त्याचे उद्घाटन केले. त्या कार्यक्रमास भाऊराव पाटील विद्यार्थी श्रोते म्हणून सहभागी झाले होते. अशा विलंबामुळे ते सदर दिवशी त्यांच्या बोर्डिगवर वेळेत भोजनाला पोहचू शकले नाहीत. नियमामुळे अधीक्षकानी त्यांचे भोजन व निवास कायम बंद केले. त्यामुळे भाऊरावांनी, शाहू महाराजांची भेट घेऊन ही अडचण सांगीतली. तेव्हा स्वतः शाहू राजांनी भाऊराव पाटील यांना राजवाड्यात भोजनासह कायम ठेऊन घेतले. त्याच कर्मविरांनी पुढे ५० हजार गोर-गरीबांच्या मुलांना निवासी शिक्षण देत असल्याचे, सन १९५३ साली राजाराम हायस्कूलच्या एका माजी समारंभात, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या, डॉ. सर्व पल्ली राधाकृष्णन यांना मोठ्या अभिमानाने कथन केले. अर्थात शाहू महाराजासारखा समता व माणूसप्रेमी राजा, संपूर्ण जगाच्या इतिहासात पहिलाच असावा. या शिवाय शाहू महाराजांच्या प्रेरणेतून महामानव डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, गंगाधर टिळक व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे अनेक रत्न, महाराष्ट्राने आपल्या देशाला अर्पण केले असेही, प्रा. वसंतराव वाघमारे म्हणाले.शतकपार कुस्तीगीरांचा गौरव !

----------------------------------- यावेळी शिरोळ-वांजरवाडा येथील १०१ वर्षाचे आयुष्य पार केलेले, एक नामवंत तथा ज्येष्ठ कुस्तगीर पट्टू श्री रोहिदासराव कदम पैलवान शिरोळकर यांचा, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, महाराष्ट्र राज्य परिट - धोबी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री गणपतराव तेलंगे यांच्या हस्ते शॉल, फेटा व पुष्पहार घालून हृद्य सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्ते रोहिदास कदम हे माजी सेक्रेटरी असून, त्यांनी सन १९७२ च्या सुमारास गावचे एक लोकप्रिय सरपंच म्हणूनही, आपली कारकिर्द यशस्वी केली. हे त्या पंचक्रोशीत सर्वश्रूत आहे. तर जंयती उत्सवाचा समारोप म्हणून आज २९ जून रोजी सकाळी ७ वाजता, या छ. शाहू महाराज उद्यानामध्ये हभप सुर्यवंशी महाराज बोरीकर व से. नि. ज्येष्ठ क्रिडाशिक्षक श्री दिगंबरराव बारसकर महाराज यांच्या हस्ते, पिंपळवृक्ष रोपन करण्यात आले.

या दोन दिवशीय संयुक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर रवि कांबळे यांनी केले. तर सूत्र संचालन श्री डी. के. सुरवसे यांनी केले. आणि आभार प्रदर्शन बालमोहन बनसोडे यांनी केले. यावेळी नागोराव कांबळे, अशोकराव पांचाळ, वसंतराव वंजारे, व्यंकटराव काकनाटे, मे. संभाजीराव दोरवे, श्री रमेशराव केंद्रे, से.नि.मुख्याध्यापक श्री वाल्मिकराव काळे, अक्षय कदम, मधुकरराव कांबळे, संभाजीराव मस्के, श्री गुलाबराव बिराजदार, श्री राजकुमार पाटील, श्री शाम वरयानी, आभिमान्यू लामतुरे, प्रा.डॉ.डी.टी. घटकार, निवृत्त तहसिलदार दामोधर इंगळे, सुरेश सरवदे, प्रकाश बनसुडे, श्री अप्पा विभूते, मोहनराव टमके, विकास कांबळे, से.नि.कामगार अधिकारी श्री लिंगराम चलवाडे, लक्ष्मणराव बाभळे, आयु. सोमवंशी निडेबनकर, श्री बंकटराव कांबळे, संजय कदम, श्री विलास जाधव, पैलवान दगडू लांडगे, धनराज मुतंगे, विजयकुमार दाताळ, एच पी सुर्यवंशी, प्रकाशराव मुळे, के एम भडीकर, सूरज चव्हाण आदी निमंत्रित उपस्थित होते. -------------------------------

