
लातूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन उमाटे कुरिअर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूरच्या बस स्थानक येथे भव्य मोफत अन्नदान तथा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये वारकऱ्यांसाठी सकस अन्नाची व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील विविध भागातून तसेच शेजारील जिल्ह्यांतून येणाऱ्या शेकडो भाविकांना या उपक्रमाचा मोठा लाभ होत आहे.

अनेक वैद्यकीय अधिकारी व स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले असून, थकलेल्या वारकऱ्यांना प्राथमिक उपचार तसेच आवश्यक औषधे दिली जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांची मनापासून सेवा करत असल्याचे दृश्य ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

या वेळी बोलताना संतोष भाऊ नागरगोजे म्हणाले की, “वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून हा उपक्रम सुरू केला असून भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाटे कुरिअर आणि मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
—

