

लातूर :
लातूरकरांनी जीवाचं सोनं करून जागा दिली… ‘माझं लातूर’ परिवारानं ढणाढणा आंदोलनं केली… शेकडो लोकांनी रस्त्यावर तासनतास बसून सरकारला शहाणं केलं… शेवटी कृषी विभागाची 10एकर जमीन पैसे भरून जिल्हा रुग्णालयासाठी सरकारच्या पायाशी अर्पण केली.
पण आता काय?
हे फितूर सरकार ‘नवीन रुग्णालयांचे बांधकाम बंद’ असा फालतू अध्यादेश काढून लातूरकरांच्या तोंडावर थेट अध्यादेशरूपी जोडे झोडतंय!
साधं जिल्हा रुग्णालय उभं करायला या दळभद्री सरकारला वेळ नाही. पण त्याच लातूरकरांकडून फसवून घेतलेली जमीन मात्र कायमची संपली. जमिनी गेल्या, जागा गेल्या, पण स्वप्नं मात्र अजून मातीखालीच!
आता या फसवणुकीला कंटाळून ‘माझं लातूर’ परिवारानं पुन्हा एकदा हत्यार उपसलंय. आंदोलनाचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी थेट शिव्यांची लाखोली वाहिली —
“फुकटचे नारे, खोटी आश्वासनं, आणि शेवटी अध्यादेशाचे जोडे? एवढी लाज वाटत नसेल तर राजीनामे करा अन् घरी बसा!”
स्थानिकांनी थेट इशारा दिलाय —
“आम्ही आंदोलने करून जागा दिली, पैसे दिले, कागदपत्रं दिली. आता आमचं आरोग्य कुठं गेलं? आमच्या जीवाव उठणारा हा अध्यादेश आहे? हे पाप खपवून घेतलं जाणार नाही!”
‘माझं लातूर’ म्हणाले — “जर या अध्यादेशाला तात्काळ रद्द केलं नाही, लातूरकर शांत बसणार नाहीत .आध्यादेशामुळे विश्वासघात झाला आहे .”
आंदोलनकर्त्यांनी थेट रस्ते अडवण्याची, अधिकारी व लोकप्रतिनिधींना काळी फित बांधून घेराव घालण्याची तयारी केलीये.
“आता ना इथं ‘रुग्णालय’ राहिलं, ना ‘अंधळं सरकार’! जिल्हा रुग्णालयाच्या नावावर कुणी हिशेब खाऊ पाहात असेल, तर लातूरकर आधी त्यांना जोडे घालणार!”
🔥 ‘अरे आम्ही रक्त आटवलं, जमिनमिळवून दिली आणि तू अध्यादेश आणून जोडे घालतोस? हे पाप नाही सहन करायचं!’ — लातूरकरांची एकच गर्जना! 🔥

