गुरुवार दि १०जुलै२०२५ ते मंगळवार दि.७सप्टेबर २०२५ आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या *वर्षावास*कालावधी निमित्त बुद्ध धम्म वर्षावास पुनीत सुसंस्कार पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.या कालावधीत बुद्ध धम्माचे संस्कार जनमाणसात रुजवण्यासाठी दररोज रात्री ठिक ०७ -०० ते ०८ -००वा या वेळेत बुद्ध वंदना व धम्मपद या ग्रंथाचे वाचन. दर रविवार व दर पौर्णिमा सकाळी ठिक १० -००वा बुद्ध वंदना प्रवचन व खिरदान /भोजन दानाने संपन्न होईल. महिण्याच्या दुसर्या व चौथ्या रविवारी सकाळी १० -००ते दु.४ -००वाजेपर्यंत उपासक /उपासिकांसाठी सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन पु. भिक्खु महाविरो थेरो हे संस्कार शिबीराला पुर्णवेळ मार्गदर्शन करणार आहेत.
पु. भदंत डाॕ. उपगुप्त महाथेरो यांचे मार्गदर्शनाखाली हे बुद्ध धम्म वर्षावास पुनीत सुसंस्कार पर्व संपन्न होणार आसुन या काळात पु. भदंत प्रा. डाॕ. यशकाश्यपायन महाथेरो ,जयसिंगपुर, पु. भिक्खु महाविरो थेरो काळेगाव, पु. भिक्खु पय्यानंद थेरो ,लातूर, पु. भिक्खु सुमेधजी नागसेन,बुद्ध लेणी खरोसा हे मार्गदर्शन करणार आहेत. पु. भिक्खु पय्यानंद थेरो यांचे मंगलवाणीने धम्मपद या ग्रंथ वाचनाचा शुभारंभ दि. १०जुलै २०२५गुरुवार रोजी रात्री ठिक ७ -००वा होणार आहे. तरी सर्व बंधुभगिनी / उपासक/उपासिका यांनी या वर्षावास पुनीत सुसंस्कार पर्वाचा लाभ घ्यावा आसे आवहान केशव कांबळे ,सुर्यभान लातूरकर,दामु कोरडे,गौतम चिकाटे,त्रंबक कवठेकर ,जगन्नाथ सुरवसे व महिलामंडळा ने केले आहे.

