
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची बैठक दि. 11/07/025 रोजी शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बलभीमराव कोथींबीरे हे होते. बैठकीस संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनंत लांडगे, राज्य उपाध्यक्ष विनायक बोरीकर, राज्य संघटक रमेश श्रृंगारे यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना प्रा. अनंत लांडगे म्हणाले की, मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून समाज कार्यात झोकून देवून कार्य केले पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविल्या पाहिजे. त्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहेत. पूरोगामी चळवळी जिवंत राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटनेत कार्य करायला हवे. सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले याच बैठकीत जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अशोक बनसोडे, जिल्हा सचिव विजय गायकवाड, राज्य उपाध्यक्ष म्हणून अरुण बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष सुदेश माळाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन सोनवणे, प्रभाकर बनसोडे, दयानंद सोनवणे, अशोक बोराडे, जिल्हा सहसचिव प्रदिप शिंदे, राजेंद्र धावारे, धनंजय वाघमारे, बलभीम कांबळे, कोषाध्यक्ष बाळासाहेब माने, जिल्हा सल्लागार, दिलीप वाघमारे, नवनाथ वाघमारे, जिल्हा संघटक सुनिल बनसोडे, दिपक सरवदे, सहसंघटक नागनाथ गोरसे, विठ्ठल जेटीथोर, भागवत जेटीथोर, कायदेशीर सल्लागार ॲड. अनुरथ नागटिळक, तुळजापूर तालुकाध्यक्ष विलास सरवदे, मराठवाडा पातळीवर सहसचिव म्हणून सुनिल मनोहर बनसोडे, मराठवाडा कार्यकारणी सदस्य सतिश बनसोडे यांच्या निवडी करण्यात आल्या.
या बैठकीस रमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत, दयानंद सोनवणे, सुरेंद्र शिलवंत, प्रा. तात्याराव वाघमारे, अंकुश उबाळे, गाडे साहेब, एस.एम. बनसोडे, दिलीप वाघमारे इत्यादींची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सुदेश माळाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विजय गायकवाड यांनी मांडले.

