
लातूर -कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना किंवा त्यासारख्या संघटना या व्याख्येमुळेच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे जनसुरक्षा ऐवजी जन-असुरक्षा विधेयक आहे .या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची तसेच भारतीय राज्यघटनेने दिलेल्या घटनात्मक हक्क व अधिकारांची पायमल्ली होणार आहे .त्यामुळे त्यास विरोध केला पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी लातूर येथील बिजापूर विचार परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील होते तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राच्यविद्या पंडित डॉ आ हा साळुंखे ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यपाल महाराज हे होते.

वर्ण आणि जातीव्यवस्था हे दुःखाचे मूळ असून बदल घडवायचा असेल तर सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. घटनेतील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा मुख्य गाभा पूर्वीच होता त्याची स्पष्टता इंदिरा गांधींनी केले त्यामुळे विनाकारण वादळ उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज देशात विविध जाती आणि धर्मामध्ये कट्टरतेची चढाओढ लागलेली आहे परंतु सामान्य जनता आम्हाला जगू द्या अशी विनवणी करत आहे. अवैध संपत्ती टिकवणे किंवा कमवणे यासाठीच निर्लज्जपणे पक्षांतर होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून या देशाचे भवितव्य युवकांच्या हाती टिकवण्यासाठी वैचारिक बैठक असलीच पाहिजे आणि हे काम बिजांकुर विचार परिषद करत आहे. निश्चितपणे युवकांच्या मनामध्ये देश प्रेमाबद्दल नवे अंकुर फुटतील अशी मला आशा आहे असे विचार कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

डॉ.आ ह साळुंखे यांनी संवाद साधताना वैचारिक अधिष्ठान असलेच पाहिजे आणि त्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त असतात असे विचार सातारा येथून लातूरकरांसाठी व्यक्त केले. सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी आपल्या परखड प्रबोधनातून व्यवस्थेवर असूड ओढत सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात लातूरकरांच्या वतीने डॉ आ हा साळुंखे,बि जी कोळसे पाटील आणि प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दयानंद सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोतागण उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने भाई उदय गवारे डॉ रमेश भराटे, अँड विजय जाधव, अँड गोविंद सिरसाठ, बाळासाहेब यादव, अभिमन्यू जगदाळे ,विक्रम माकणीकर ,वैभव तळेकर ,डॉ हर्षवर्धन राऊत ,विजय औंढे ,डॉ जयद्रथ जाधव नितीन पवार अँड प्रशांत काळदाते, अँड जैनु शेख, धर्मराज पाटील ,गणेश बेळंबे , अँड हारी निटुरे, अँड गणेश यादव,यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संभाजी नवघरे आणि अँड अभिलाषा गवारे यांनी केले.

