लातूर दि. 17 (प्रतिनिधी)- पुर्वी बांधकाम परवानगी दिलेल्या अणि आत्ता खुली जागा म्हणून महापालिकेने कडे नोंद केलेल्या जागेवर तटरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू केले होते. न्यायालयात प्रकरण चालू असताना सुरू केलेल्या बांधकामास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

या प्रकरणाची थोडक्यात माहीती अशी की , सदर प्रकरणातील वादी मोहन ज्ञानदेव सोमवंशी रा. मोटेगाव ता.रेणापूर यांनी म.न.पा हद्दीतील मौजे कन्हेरी येथील सर्व क्र. 18/3 पैकी क्षेत्र 5600 चौ. फुट जागा श्रीमती राजश्री राजकुमार जाधव यांच्याकडून खरेदीखत क्र. 2719/2007 अन्वये खरेदी घेतलेली होती. श्रीमती राजश्री जाधव यांच्या कुटुंबीयांनी सदर प्लॉट जमीनीचे मुळ मालक गंगाधर रोडगे यांच्याकडुन 1998 साली खरेदी घेतला होता.
मोहन सोमवंशी यांची प्लाॅट खरेदीनंतर म.नं. पा. दप्तरी सदर जागेचे मालक व ताबेकर म्हणून नोंद घेण्यात आली होती . म.न.पा लातूरने 2013 मध्ये मोहन सोमवंशी यांना बांधकाम परवाना देखील दिला होता. परंतू सदर काळात बांधकाम करू न शकल्याने त्यांनी परत 2022 साली पून्हा म.न.पा. लातूर कडे नवीन बांधकाम परवानगी मागणी अर्ज दाखल केला. परंतु महानगरपालिकेने मोहन सोमवंशी यांचे दि. 06/05/2022 रोजी नोटीस घेऊन त्यांची मिळकती तथाकथित रेखांकनातील खुली जागा असल्याचे कारण देत बांधकाम परवाना रद्द केला. त्यामुळे मोहन सोमवंशी यांनीॲड. गुरुराज संदीकर यांच्या मार्फत दिवाणी न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्रमांक 239/ 2023 दाखल केला होता. सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबीत असतानाच म.न.पा. लातूर ने वादग्रस्त जागेवर बांधकाम करण्यासाठी निविदा मागवून एका ठेकेदारास तटरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी काम दिले. याची माहिती मिळताच ॲड. गुरुराज संदीकर यांनी सदर बाब दिवाणी न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिली. दिवाणी न्यायालयाने दि. 14/07/2025 रोजी लातूर महानगरपालिकेच्या विरोधात मनाई हुकुम आचा आदेश दिला व त्या जागेवर कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करण्यापासुन महानगरपालिकेला मज्जाव केला. सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने तर्फे ॲड. गुरुराज व्यं. संदीकर यांनी बाजू मांडली त्यांना ॲड सुप्रिया बिडवे, ॲड धनराज शिंदे, ॲड. पृथ्वीराज चंदगीरे व ॲड.रितेश रत्नगोले यांनी सहकार्य केले.
..

