
लातूर : भारतीय शास्त्रीय संगीतातील महान गुरु पं. शांताराम चिगरी गुरुजी व आदरणीय स्व.शकुंतलादेवी चिगरी यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमेनिमित्त सुरताल शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 जुलै,वार बुधवार रोजी सायंकाळी 6.00 वाजता नवीन रेणापूर नाका येथील सुरताल संगीत महाविद्यालय येथे युवा गायिका भक्ती पवार,पुणे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

या संगीत मैफिलीसाठी तबल्याची साथ संगत श्री.अक्षय कुलकर्णी व हार्मोनियमची साथ संगत श्री.सूर्यकांत घोडके हे करणार असून. भक्ती पवार या विद्यापीठ गोल्ड मेडलिस्ट असून , भारतामधील अनेक संगीत महोत्सवामध्ये त्यांनी आपली कला सादर केलेली असून युवा गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. तरी सर्व रसिक जणांनी या संगीत सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन सुरताल परिवाराच्या वतीने सोनू डगवाले डॉ.संदीप जगदाळे ,केंद्रव्यवस्थापक संजय सुवर्णकार, विजय श्रीमंगले, अमर कडतने, सौ.मीनाक्षी कोळी,सौ.नभा बडे , प्रमोद भोयरेकर, हरीश कुलकर्णी , व्यंकट काळे,दीपक शिंदे प्रा.परमेश्वर पाटील व सुरताल संगीत महाविद्यालयातील सर्व सदस्यांनी केले आहे .


