
लातूरः भगवान बुद्धानी बुद्धत्वप्राप्तीनंतर मानवाच्या दुखःचे मुळ शोधले. जगाचा कर्ताकरवीता कोण याचा विचार न करता ,माणसाने दुखःमुक्त कसे व्हावे यावर विशेष भर दिला.बुद्ध म्हणाले बाहेरच्या जगात आपला शत्रू कोणीच नाही. आपल्या मनात जो क्लेश रुपी शत्रू आहे ज्यांना राग,द्वेश,मोह म्हटले आहे,तेच आपले प्रमुख शत्रू आहेत आसे प्रतिपादन भिक्खु महावीरो थेरो यांनी वैशाली बुद्धविहार बोध्दनगर लातूर येथे बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वानिमित्त आयोजित उपासक /उपासिका संस्कार शिबीरात केले.

पुढे बोलताना म्हणाले,जेवढे वाईट तुमचे बाहेरील शत्रू करणार नाहीत ,तेवढे वाईट तुमचे कुमार्गाला गेलेले मन करते.जेवढे चांगले आपले मातापिता ,आप्तेष्टकरणार नाहीत तेवढे भले पवित्र मार्गाला गेलेले मन करते. मनाचे विकार हेच दुःखाचे मुळ कारण आहे. जे मन अनित्य आहे .पंचइंद्रीया द्वारे मानवाला त्रुष्णेचा गुलाम करायला लावते त्या मनाचे व सतत बदलणार्या शरीराचे आपण मालक नाहीत. म्हणुनमानवी दुःखास कारणीभुत आसणार्या अविद्या व त्रुष्णा यांचा नाश करा तरच माणुस सुखी होईल आसे विचार मांडले,
रविवार रोजी सकाळी १० -०० ते दु. ४ -००या वेळेत हे संस्कार शिबीर संपन्न झाले. प्रथम भ.बुद्ध व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करुन बुद्धवंदना घेउन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी महाविरणचे उपअभियंता शीलरत्न सुर्यवंशी ,सेवानिव्रुत्त इंजिनियर डि, के, मोरे यांचा सत्कार करण्यात आला. एमपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल सिद्धांत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.या शिबीरास आयु.दिक्षाराणी -विनोद खटके यांनी भोजनदान दिले.यावेळी माजी नगरसेवक सचीन मस्के ,भारतीय बौद्धमहाभेच्या जिल्हाध्यक्षा आशा चिकटे ,राजु काआबळे ,गौतम चिकाटे ,सुर्यभान लातूरकर,दामु कोरडे ,त्रंबक कवठेकर ,हरिश्चंद्र सुरवसे,उत्तम गायकवाड ,कुमार सोनकांबळे ,असित कांबळे,लताबाई चिकटे ,शकुंतला नेत्रगावकर,शीला वाघमारे,शारदा वाघमारे,सविता चिकाटे , लता गायकवाड ,लता कांबळे ,लता श्रंगारे,जनाबाई सोनवणे,मिरा शेळके,निलुबाई कांबळे आदीसह लातूरशहरातील उपासक/उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.धम्मपालन गाथा व भन्तेजींच्या आशिर्वचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचलन केशव कांबळे यांनी केले.

