• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
May 10, 2026
in Blog
0
महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभय मिरजकर

मराठी साहित्यात विविध प्रकारांच्या साहित्याचा समावेश आहे.  जसे की, कविता, कथा, निबंध, नाटक, तत्वज्ञान ,विवेचनात्मक साहित्य, आत्मचरित्र यामध्ये पण अनेक विभाग आहेत. या सर्व प्रकारांनी मराठी साहित्याला विविधतापूर्ण बनवले आहे आणि त्यामुळे वाचनाची एक समृद्ध अशी परंपरा तयार झाली आहे. आत्मचरित्र हे लेखकाच्या जीवनाचा अभ्यास आणि त्यांचे अनुभव या दृष्टीने पाहिले जाते.

खरे तर आत्मचरित्र म्हणजे संबंधित  व्यक्ति किंवा लेखकाने स्वतःच्या जीवनाबद्दल, अनुभवांबद्दल, संघर्षांबद्दल आणि भावनांबद्दल लिहिलेलं लेखन. आत्मचरित्रामध्ये लेखक त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्यावर झालेले प्रभाव, त्यांचे विचार, भावना, आणि अन्य व्यक्तींचा त्यांच्यावर असलेला प्रभाव याचे चित्रण असते.

            लातूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी ” जागरण ” हे आत्मचरित्र ९ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित केले. या संदर्भात माहिती देताना भारत सातपुते यांनी सांगितले की,  जागरण ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. आता जागरणची पाचवी आवृत्ती निघाली आहे. ऑनलाइन देखील जागरणची सहावी आवृत्ती बी एफ सी पब्लिकेशन लखनऊ उत्तर प्रदेश यांनी काढली आहे हे पुस्तक आता ॲमेझॉन ॲप वर देखील मिळते आहे . केवळ दोन वर्षांच्या आतच जागरणन ने  हा टप्पा पार केला गेला आहे. 

      जागरण चे यश एवढ्यावरच थांबले नाही तर  जागरणवरील ‘भारतपर्व’ हा समीक्षा ग्रंथ आहे. जो 26 जानेवारी २०२६ ला प्रसिद्ध झाला. जागरण वर आजपर्यंत २७५ पेक्षा अधिक समिक्षा , अभिप्राय आलेले आहेत. भारतपर्व या समिक्षा ग्रंथात  २५० समीक्षा आहेत. ज्यातील दीडशेपेक्षा जास्त समीक्षा या देशभरातील विविध मराठी वृत्तपत्र, नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. 

                         सर्व क्षेत्रातील समीक्षकांनी जागरण वर लिहिले आहे. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक ,डॉक्टर, इंजिनिअर ,शेतकरी, बँक, पोस्ट, कामगार , पञकार आदी क्षेत्रातून जागरणवर लेखन झाले आहे. महाराष्ट्रासह केरळ ,कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात अशा अनेक राज्यातून जागरणवर समीक्षा लिहिलेल्या आहेत. *जागरणचा हिंदी अनुवाद ‘जागर’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. इंग्रजी, कन्नड, गुजराती या भाषेतही लवकरच जागरण प्रसिद्ध होणार आहे. मराठी साहित्यातील 720 पानांचा हा भारतपर्व समीक्षा ग्रंथ कदाचित पहिलाच असावा. या शिवाय समिक्षेचा आणखी एक स्वतंत्र ग्रंथ काढावा लागणार आहे.  

            वाचन संस्कृती संपली अशी ओरड केली जाते पण त्या मध्ये तथ्य नाही हे जागरण ने सर्वांना दाखवून दिले आहे.  शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना जागरण हे प्रेरणादायी असल्याने खरंतर विद्यापीठ अथवा अभ्यासक्रम मंडळांनी या पुस्तकाची दखल घ्यायला हवी. आत्मचरित्र वाचनामुळे वाचकांना एक नवीन दृष्टिकोन मिळतो, तसेच लेखकाने त्यांच्या आयुष्यातील अनुभवांमधून काय शिकले हे समजून घेतले जाते. महाराष्ट्रात आत्मचरित्रातील लातूर पॅटर्न जागरण ने निर्माण केला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. 

Previous Post

शिवजयंती निमित्त सेवा, समर्पण आणि संस्कारांचा गोड संदेश

Next Post

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post
मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026

Recent News

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved