• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यातील हयगय खपवून घेणार नाही; सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 23, 2025
in Blog
0
0
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र

लातूर, दि. २३ जुलै २०२५: मराठवाड्यात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या सेवेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिला. अचूक बिलिंगसाठी नादुरुस्त व सदोष व वीजमीटर तातडीने बदलण्यात यावेत तसेच प्रत्येक महिन्याला वसूलीचे उदिदष्ट १०० टक्के पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी बुधवारी (दि. २३) दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात छत्रपती संभाजीनगर, नांदेड व लातूर परिमंडलातील विविध कामे व योजनांसह प्रामुख्याने मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा श्री लोकेश चंद्र यांनी आढावा घेतला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य जिवने, संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे व श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंते सर्वश्री अरविंद बुलबुले (लातूर), पवनकुमार कछोट (छ. संभाजीनगर), राजाराम माने (नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, मराठवाड्यात विविध योजनांद्वारे प्रामुख्याने औद्योगिक वसाहती परिसरांसह शहरी व ग्रामीण भागात वीज वितरण यंत्रणेचे जाळे भक्कम करण्यात येत आहेत. ही कामे गतिमान व दर्जेदार होतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करणे महावितरणची जबाबदारी आहे. यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. काही कारणांनी वीज पुरवठा खंडित झाल्यास प्रथम पर्यायी स्वरूपात तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून खंडित विजेचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, महावितरणचे अस्तित्व हे वीजबिलांच्या महसूलावरच अवलंबून आहे. गेल्या तीन चार महिन्यांमध्ये महसूलाच्या उद्दिष्टाप्रमाणे बिलांची वसूली झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. थकबाकी व चालू वीजबिलांचे उद्दिष्ट दरमहा पूर्ण करावे. तसेच जुन्या नादुरुस्त किंवा सदोष वीजमीटरमुळे महावितरण व ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. असे जुने मीटर तातडीने बदलण्यात यावेत.

घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत करणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर ऊर्जा कृषिपंप आदी प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्राहकांना लाभ मिळवून देणे हे महावितरणमधील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे सौरग्राम योजनेला मोठे पाठबळ मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने या योजनेला आणखी गती द्यावी. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनेची माहिती द्यावी. गावागावांमध्ये प्रबोधन करावे अशी सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली.

उद्योजकांकडून समाधान व्यक्त– आढावा बैठकीनंतर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी स्थानिक उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी वीजसेवा व प्रश्नांबाबत चर्चा झाली. पूर्वीच्या तुलनेत सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होत असल्याचे नमूद करीत उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

विध्यार्थ्यानी आपल्या विध्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून अभ्यास करावा, प्रा,अनंत लांडगे

Next Post

डॉ.बाबासाहेब ठोंबरे देशी गोवंश संशोधनाबद्दल सन्मानित

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

डॉ.बाबासाहेब ठोंबरे देशी गोवंश संशोधनाबद्दल सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

विश्व हिंदी परिषद दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती

March 10, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

March 10, 2026

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

March 7, 2026

Recent News

विश्व हिंदी परिषद दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती

March 10, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

March 10, 2026

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

March 7, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

विश्व हिंदी परिषद दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती

March 10, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved