
औसा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते त्यानुसार आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यातील भुसणी आणि फत्तेपूर येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
फत्तेपूर येथील लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संगमेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे बाबुराव मोरे होते, प्रमुख पाहुणे ॲड. परिक्षित पवार, प्रा.अजय वाघमारे होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक बालासाहेब मसुरे, सुयोग सुरवसे शाळेचे मुख्याध्यापक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. तर भुसणी येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रम प्रा. अजय वाघमारे आणि दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षकांनी केले, ॲड.परिक्षित पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी लातूर उमरगा बसेस फत्तेपुर पाटीवर थांबा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबुरावजी मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक कांबळे, तर आभार शाळेचे मुख्याध्यापक मुळे सरांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. दोन्ही शाळेतील विद्यार्थी शालेय साहित्य भेटल्याने आनंदी झाल्याचे दिसून आले.

