लातूर : सफाई कामगार बलिदान दिवस म्हणून 31 जुलै 1978 पासून देशभर साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने हा दिवस साजरा केला करण्यात येणार आहे. त्यानिमित्त गुरुवारी 31 जुलै रोजी लातूर शहरातील गांधी मार्केट येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात सायंकाळी 4 वाजता लातूर मनपाच्या स्वछता सफाई कामगारांचा सत्कार सोहळा आयोजित केला असून सहाय्य्क कामगार आयुक्त मंगेश झोले हे उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती कामगार नेते तथा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी दिली आहे.
सफाई कामगारांचे स्वछता व सफाई मधील योगदान लक्षात घेवून कामगार बलिदान दिवस लातूरमध्ये गेल्या चार पाच वर्षांपासून साजरा केला जातो. या दिवशी स्वछता व सफाई काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन कामातील अडचणी, त्यांच्या प्रश्नांची चर्चा करून ते सोडवण्याचे नियोजन केले जाते. तसेच सफाई कामगारांसाठी असलेल्या योजना व कायदे याची कामगारांना माहिती दिली जाते. लातूर मनपा अंतर्गत स्वछता व सफाईचे काम करणाऱ्या निर्व्यसनी राहून आपले काम चोखपणे निभावणाऱ्या तसेच आपल्या पाल्याना शिक्षण व उच्च शिक्षण देणाऱ्या कामगारांना आदर्श गुणवंत कामगार म्हणून 13 कामगारांचा सत्कार सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास लातूर शहरातील स्वछता सफाई कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सचिव शिवाजी भंडारे, उपाध्यक्ष सुरेश काटे, लातूर शहराध्यक्ष अंकुश टकळगे, तालुकाध्यक्ष चंद्रपाल गिरी, मंगलताई शिंदे, नूतन अंगरखे, घंटागाडी सफाई कामगार विभाग अध्यक्ष विशाल काळे, सचिव महेंद्र कांबळे, ज्योती उपाडे, लहू जगताप, परमेश्वर कांबळे, सुधीर कांबळे, आयुब शेख, ईश्वर काळे, सुनील सगट, अंजना सगट, अभिजित बनसोडे, कुमार कांबळे, अमोल शिंदे, रोहित कांबळे, अन्तेश्वर सगट, अंगद बनसोडे, सूर्यकुमार गायकवाड, सचिन काळे, किशोर सगट, शिलाताई भोळे, रेणुकाताई कांबळे, बंडू कांबळे, लक्ष्मी सोनवणे, रेखाताई शिंदे, रुक्मिणी कांबळे आदींनी केले आहे.

