
लातूर, दि. ३० जुलै —
लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लातूरमध्ये स्वरविलास संगीत दरबार या अभिजात शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या दुसऱ्या वर्षी किराणा घराण्याचे जगविख्यात शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे सुरमधुर गायन रसिकांना अनुभवता येणार आहे.
लातूरची सांस्कृतिक चळवळ संजीव करणाऱ्या विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीला समर्पित असलेल्या या संगीत दरबाराचे आयोजन १५ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ५:३० वा. दयानंद सभागृह, लातूर येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.
शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी मागील १२५ महिन्यांपासून कार्यरत असलेल्या आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने या संगीत दरबाराचे आयोजन होत असून, यामागे सहकारमहर्षी मा. दिलीपराव देशमुख यांची संकल्पना व प्रेरणा आहे. मागील वर्षी मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने या दरबाराची सुरुवात झाली होती.
यंदाच्या कार्यक्रमात पं. जयतीर्थ मेवुंडी यांना पुण्याचे युवा तबलावादक महेशराज साळुंके तबल्याची साथसंगत करणार असून, कोल्हापूरचे स्वरूप दिवाण हे संवादिनी वादन सादर करणार आहेत.
या दरबाराच्या यशस्वीतेसाठी आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, नियोजनप्रमुख विशाल जाधव, मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा.शशिकांत देशमुख, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, महेश काकनाळे, केशव जोशी, व्यंकटेश पांचाळ, खंडागळे सर, शिरीष डावरे, शंभूदेव केंद्रे, हरीराम कुलकर्णी, दिनकर पाटील, काकासाहेब सोनटक्के, दत्ता पाटील, सतीश मिरखलकर, डॉ. भदाडे, हेमंत रामढवे, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. मंजुषा कुलकर्णी व इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
स्वागताध्यक्ष मा. दिलीपराव देशमुख यांनी संगीतप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
⸻

