
…लॉकडाऊनच्या आधी दोन महिने राहुल गांधी सतत ट्विट करून सांगत होता की, “भारतातील लोकांसाठी कोरोना हा गंभीर धोका आहे. केंद्र सरकार हा धोका गांभीर्यानं घेताना दिसत नाही. सरकारनं तातडीनं ॲक्शन घेण्याची वेळ आली आहे. वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.” भक्तपिलावळ हसली. “पप्पू आहे तो. अक्कल नाही त्याला.” म्हणत येड्यात काढलं. केंद्रातले सत्ताधारी नेते मध्यप्रदेशातले आमदार विकत घेऊन सत्ता ओरबाडण्यात गुंग होते. तोपर्यन्त कोरोनानं कहर माजवला. वेळ निघून गेल्यावर लॉकडाऊन वगैरे झाला. नंतर काय झालं, त्याकाळात देश किती भयाण संकटातनं गेला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचे दुष्परिणाम आजही आपण भोगतोय.
..सरकारनं जेव्हा ‘इलेक्टोरल बाँड’ची योजना जाहीर केली होती, ती आजकालच्या प्रथेप्रमाणं ‘प्रोपोगंडा’ करतच केली. जीएसटी, नोटबंदी, पीएम केअर, कोविडची लस, सिंदूर वगैरेसारखंच.
…एकटा राहुल गांधी ओरडून-ओरडून सांगत होता की “इलेक्टोरल बाँड हा खुप मोठा भ्रष्टाचार ठरणार आहे.” लगेच सगळ्या आयटीसेल आणि संगोटी पिलावळीनं ‘पप्पूला काय कळतंय’ अशी टर उडवणं सुरू केलं.
नंतरच्या काळात इलेक्टोरल बाँडचा महाघोटाळा उघडकीला आल्यावर सगळ्या देशाला पटलं ‘पप्पू’ आपल्यापेक्षा शहाणा होता !
काल ‘द ग्रेट राहुल गांधी’नं देशासाठी, संविधानातल्या मुल्यांच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जे केले आहे त्याची देशाच्या इतिहासात खुप महत्त्वाची नोंद होणार आहे. आपल्या भारतावर पडलेला दरोडा, झालेली मतांची लूट, चोरलेलं संविधान याचा पुराव्यांसहित पर्दाफाश करून ‘देशाचे खरे दुश्मन’ नागडे केले त्यानं. या भुमीवर मुघल,ब्रिटिश अशी अनेक आक्रमणं झाली. धनसंपत्तीची प्रचंड लुट झाली. पण मतांची लूट करून या भुमीवर भ्रष्ट, जुल्मी सत्ता लादण्याचा जो अत्यंत नीच प्रकार होतो आहे, त्याला वाचा फोडून राहुलने खूप मोठ्या क्रांतीचा एल्गार केला आहे. या देशवासियांवर लादलेली गुलामगिरीची जोखडं झुगारून देण्यासाठी या मर्दगड्यानं शड्डू ठोकला आहे.
राहूल राजीव गांधी ! या देशाला कायम तुझा अभिमान वाटत राहील ! तुझ्या वडील आणि आजींनी देशासाठी बलिदान दिलंय. तुझ्या चार पिढ्या या देशाच्या सेवेत खपल्यात. आज तू दाखवून दिले आहेस की तुझ्या धमन्यांमधून तेच रक्त वहातेय. तुला कितीही हिणवलं तरी तू डगमगला नाहीस. एखाद्या एकाकी निडर हिरोसारखा तू देशद्रोह्यांना जाब विचारत राहिलास. कधी ना कधी कळेल की, काळानं तुझी नोंद घेऊन ठेवलेली आहे. भारत देशावर क्रूर नराधमांनी कब्जा केलेला असताना, त्या भयावह काळात हा एक असा खतरनाक वाघ होता, जो डॉ. आंबेडकरांच्या संविधानातल्या ‘आदर्श विरोधी पक्षाची’ लढाई हिमतीनं लढत होता !
सलाम राहुल. कडकडीत सलाम.
जयहिंद. राष्ट्रप्रथम.
-किरण माने.

