
लातूर (११ ऑगस्ट २०२५):
लाल बहादूर शास्त्री विद्यालय, लातूर येथे आज “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेगारीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाविद्यालय ( स्वायत्त ), लातूर. मधील सायबर वॉरियर्स शैलेश जामगे , गायत्री हुडगे, प्रणव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मिडिया सुरक्षेचे नियम, पासवर्ड व्यवस्थापन, फिशिंग अटॅक्सपासून बचाव यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला व प्रश्नोत्तर सत्राद्वारे आपल्या शंका दूर केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बिराजदार सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना सायबर सेफ्टीवर आधारित शपथ देण्यात आली.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि ऑनलाइन सुरक्षितता याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

