
लातूर,दि.१८ः आलमता,ता.औसा येथील विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल सुर्यकांत कमलाकर जाधव यांना सहचारिणी संगीता जाधव यांच्यासमवेत सन २०२३-२०२४ चा महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयाचा छत्रपती संभाजी नगर विभागीय डॉ.एस.आर.रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक(ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान रविवार,दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईच्या एसएनडीटी महिला मुक्त विद्यापीठ सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोरे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,उपसचिव अमोल मुत्याल,ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.२५ हजार रुपये,स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र,ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सदरील कार्यक्रमाला राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील,राज्य कोषाध्यक्ष भीमराव पाटील,राज्य कार्योपाध्यक्ष तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह ग्रंथमित्र राम मेकलेे,जिल्हाध्यक्ष ग्रंथमित्र प्रभाकर कापसे,उपाध्यक्ष ग्रंथमित्र युवराज जाधव, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे,लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर,लिपिक हिरालाल पाटील,नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी,बाळासाहेब देवणे,जिल्हा ग्रंथालय संघ संचालक किरण बाबळसूरे, अनिल पाटील,गुुरुपद सावळगे,शिवाजी मुळे,विवेकानंद वाचनालयाचे उपाध्यक्ष विश्वनाथ बिराजदार,दिलीप पाटील,मोहंमद शरीफ फाजल,रमाकांत देशपंाडे, शिवरुद्रअप्पा धाराशिवे, दत्तात्रय कलूरे,एकनाथ कुंभार, ग्रंथालय विकास परिषदेचे विद्यासागर हणमंते, ग्रंथमित्र संतोष करमले,प्राचार्य मुळे,गिरीधर जंगाले,विद्याधर गायकवाड,होनमाडे, ग्रंंथमित्र श्रीधर स्वामी,महादेव खिचडे,भीमराव पाटील,पवन गिरवलकर तसेच ग्रंथालय अधिकारी ,कर्मचारी, ग्रंथालय कार्यकर्ते,ग्रंथालय कर्मचार्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना,ग्रंथमित्र पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करुन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे ४० टक्के अनुदान वाढ,वर्ग बदल,नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात शासन स्तरावर सुरु असलेल्या कारवाईची माहिती देत वाचकांना अधिकाधिक चांगले साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रंथालय चळवळीतील सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

