माझे घर येथील झाडांच्या पानांचा श्री गणेश आणि त्याची आरास
लातूर दि. ३० (अभय मिरजकर)– गणेश उत्सव म्हणजे प्रबोधन ही संकल्पना घेऊन अनेकजण काम करत असतात. लातूर जिल्ह्यातील अनाथ, एकल पालक मुलांच्या माझं घर या संगोपन केंद्रामध्ये पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी मुला-मुलींच्या सहकार्याने थेट पानांचा गणपती बसवण्यात आला आहे. वड, पिंपळ, बकुळ, कदंब , कोरफड याची पाने वापरुन तयार केलेल्या गणेशाची स्थापना केली आहे. जिल्ह्यात या अनोख्या उपक्रमाची चर्चा होत आहे.
लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला एक नवीन सामाजिक आणि राजकीय आवाज दिला. 1893 मध्ये टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात केली, ज्यामुळे हा सण एकत्रितपणा, एकता आणि राष्ट्रीयतेचा प्रतीक बनला. टिळकांच्या योजनेचा उद्देश सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करणे आणि भारतीयांना एकत्र आणणे होता. टिळकांनी गणेश उत्सवाला राजकीय स्वरूप दिले आणि भारतीय स्वातंत्रतेसाठी संघर्षात त्याला महत्त्वपूर्ण साधन म्हणून वापरले. प्रबोधन करणे यासाठी गणेश उत्सवाचा वापर सध्या अनेक जण करत आहेत. लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. पर्यावरण संदेश देण्यासाठी झाडांचा गणपती, गणेश मंडळांच्या वतीने वृक्ष वाटप, फुलांची रोपे वाटप याबरोबरच आरोग्य शिबीर, डोळे तपासणी, मधूमेह तपासणी असे नानाविध उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येत असतात.
माझं घर येथे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी थेट पानांचा गणपती ही संकल्पना राबवण्यात आली. माझं घर , सह्याद्री देवराई , लातूर वृक्ष च्या चळवळ या सगळ्यांनी मिळून विविध वृक्षांच्या पानांपासून तयार केलेला गणपती बसवण्यात आला.
यामध्ये वड, पिंपळ बकुळ, कदंब , कोरफड याची पाने वापरली गेली आहेत. सार्वजनिक पद्धतीने जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा बसवण्यात आलेला हा पहिलाच गणपती आहे. यामधून आपण पर्यावरण पूरक संदेश देण्यात येत आहे. निसर्ग जतन करा, विविध वनस्पती, देवराई जतन करा,वृक्ष संवर्धन करा, झाडे असतील तर त्यामुळे मातीमध्ये पाणी टिकेल यासोबत प्लास्टिक कॅरीबॅग टाळा, सजावटीमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक मटेरियल टाळावे. हा संदेश या पर्यावरणपूरक गणेश स्थापनेतून देण्यात आला आहे. झाडांची पाने हे या ब्रह्मांडातून विविध प्रकारच्या औषधी गुणधर्म हवेतून शोषण करतात आणि वाळल्यानंतर त्यांचा पालोपाचोळा कुजून तो देखील खत म्हणून माती सुपीक करण्यासाठी मदत करतो. म्हणजे वृक्ष प्राणवायू देतोच सोबत पान ,फळ, बिया या सगळ्या गोष्टीमुळे मानवाचे इतर जीवांचे अस्तित्व आहे. हा संदेश या मधून देण्यात आला. त्याचप्रमाणे गणेशा समोर विविध प्रकारच्या भाज्यांची रोपे आणि त्याची माहिती पण देण्यात आली आहे. त्यामुळे मुले-मुली सर्व भाज्या आवडीने खातात.
पानांपासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना करण्यात आली यावेळी माझं घर या प्रकल्पावर करण्यात आली यावेळी प्रकल्पाचे प्रमुख शरद झरे ,संगीता झरे, सुपर्ण जगतात, प्रणव भुसनुरे, बसवराज मुस्तापुरे, माऊली गंभीरे, संजय गायकवाड, अमोल गायकवाड, राजेंद्र कासार, किशोर सांडवे, राजश्री कांबळे, अमृता बनसोडे, विजयालक्ष्मी भुसनुरे, माझं घर बाल गणेश मंडळ अध्यक्ष अभिजित सुरवसे, उपाध्यक्ष गायत्री गायकवाड ,राहुल राठोड ,जयंत चौधरी,लिंबराज धुमाळ , कृष्णा राठोड यांच्या सह मुले, मुली उपस्थित होते.

