
*लातूर दि.२(प्रतिनिधी)- शहरातील औसा रोड भागातील श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत आयुष्यमान कार्ड नोंदणी साठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमंत केशरी गणेश मंडळ आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० पासून दूपारी १.३० पर्यंत या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत आयुष्यमान कार्ड काढले जाणार आहे. तपासणी साठी येताना आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी

सोबत आधारकार्ड घेऊन यावे. तसेच रेशनकार्ड ऑनलाइन असावे. लातूर शहरातील नागरीकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा. औसा रोड आयसीआयसीआय बँक जवळील श्रीमंत केसरी गणेश मंडळात तपासणीसाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.


