
मसलगा पुलावर दिलेला शब्द शेतकऱ्यांनी विसरलेला नाही…
लातूर :
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातील मसलगा पुलावर थांबून नदीकाठच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे जाहीर आश्वासन देऊन गेले होते. मात्र आज दोन वर्ष उलटून गेले, तरी शेतकऱ्यांना मदत नाही, न्याय नाही – फक्त आश्वासनांचे ढग! पिके वाहून गेली, पण नुकसानभरपाई अजून कागदावरच.
शासनाने दिलेल्या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाहीत. अधिकाऱ्यांचे केवळ पंचनामे, शेतकऱ्यांना हक्काचा दिलासा नाही.
बँक कर्जाच्या जाचक वसुलीने शेतकरी पिळवटून निघाले.
शेतकऱ्यांचा थेट सवाल –
“मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपण दिलेला शब्द पाळणार की नाही? शेतकऱ्यांना आश्वासनांवर नाही, न्याय आणि दिलासा हवा आहे!”
जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष.
शेतकरी संघटनांची सरकारला अंतिम इशारा – तत्काळ निर्णय घ्या, नाहीतर तीव्र आंदोलन छेडू.
“मुख्यमंत्री साहेब, शब्दाला किंमत नसेल तर जनतेचा विश्वास कसा टिकेल?” असा जळजळीत सवाल.
लातूर जिल्ह्यातील शेतकरी आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन फक्त गाजराची काठी ठरते की ठोस कृती होते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत!

