
रेणापूर -(सा.वा ) ग्रामदैवत श्री रेणुकादेवी मंदिरात दसरा नवरात्र मोहत्सव सूरू असुन या श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी दहा दिवस व दसरा दिवसी या आकरा दिवस महिला .पूरूष दर्शनासाठी पायी चालत येऊन नवस बोलतात व मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडतात अशी हि श्री रेणुकादेवी नवसाला पावणारी आहे.

याच देवीची बहीन म्हणून रानातली तूकाआई देवीचे मंदिर असून ते गावापासून दोन तीन कीलो.मीटर रानात दूर असुन या रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आलेला भक्त हा रानातील तुकाईदेवीच्या दर्शनासाठी जातो त्या मंदिरात जाण्यासाठी दोन किलोमीटर रस्ता हा साधा मुरूम टाकलेला असून दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे मुरूम व रानातील माती यामुळे पूर्ण रोड चिखलमय झाला असून या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी स्त्री पुरुष भक्तांना मोठी कसरत करत दर्शनासाठी जाण्याची वेळ आली आहे .

मागे दोन वेळेस या रस्त्याचे डांबरीकरण रस्ता झाला पण तो निकृष्ट रस्ता वाहून गेला तरीपण त्यानंतर येथील नगरपंचायला हा देवीला जाण्याच्या रस्ता सिमेंट रोड करता आला नाही त्यामुळे यावर्षी दोन दिवसापासून सतत धार पाऊस असल्यामुळे सर्व रस्ता चिखलमय झाला असून या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना कसरत करत चिखल तुडवत दर्शनासाठी जात असून अशी परिस्थिती पाहून किमान नगरपंचायत ने सिमेंट रोड करून भविष्यातील भक्तांची अडचण पाहून सिमेंट रोडचे काम करावे अशी मागणी भक्तगणातून केली जात आहे


