
लातूर, दि.३० सप्टेबर (प्रतिनिधी): स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या वतीने काल (दि.२९) मोठ्या उत्सहात करण्यात आले होते. या कार्यक्रमातून महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्युत भवन येथे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले , सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं) चेतन वाघ, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, कार्यकारी अभियंता अरविंद घाटगे यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडलेल्या सन्मान सौदामिनींचा या कार्यक्रमासाठी प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. प्रणिता चाकूरकर यांनी स्त्रीयांचे आरोग्य व सामाजिक स्वास्थ्य या विषयावर उपस्थित महिला अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या व सोशल मेडियाच्या जीवनात महिलावर्ग स्वतःच्या आरोग्याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष्य करीत आहे. अनावश्यक अशा गोष्टीमध्ये वेळ खर्ची जात असल्यामुळे आपण ना कुटूंबाचे स्वास्थ्य जपत आहोत ना आपल्या मुलांबाळांकडे निटसे लक्ष देत आहोत. नौकरीतला तणाव व कुटूबावरील प्रेम यामध्ये तणावच आपल्या जीवनावर परिणाम कारक पणे वरचढ ठरताना दिसत आहे. परिणामी चिडचिड होणे, मुलांना नीट समजावून घेणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महीला कर्मचाऱ्यांनी तणाव मूक्त राहूण काम करावे व कुटूंबासोबतच सामादिक स्वस्थ्य अबाधीत ठेवावे असे विचार व्यक्त केले. सुरवातीला मुख्य अभीयंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कुटूंबाचा व कार्यलयीन कामकाजाचा भार सांभाळत अनेक अधिकारी कर्मचारी महिलांनी ज्या प्रकारे कठीण प्रसंगांना तोंड देत यशस्वी कारकीर्द घडवली, ते उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त होत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असल्याचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक (मासं) श्री अजीत जैन यांनी केले.
फोटो ओळ: महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करताना मुख्य अभियंता अरविंद बुलबुले सोबत डॉ. प्रणिता चाकूरकर व इतर अधिकारी

