
लातूर :
दयानंद कला महाविद्यालयाने ‘ज्ञानतीर्थ युवक महोत्सव – २०२५’ मध्ये पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत एकूण अकरा पारितोषिकांसह उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत संस्थेचा अभिमान वाढवला आहे.
यात पारितोषिक व्यंग्य चित्र – ज्ञानेश्वर साठे (सुवर्ण पदक), कथाकथन – कु. सई शिंदे (रौप्य पदक), मिमिक्री – स्नेहल विभाते (रौप्य पदक), सुगम भारतीय गायन – भूषण पाटील (रौप्य पदक), स्थळ छायाचित्र – ज्ञानेश्वर साठे (रौप्य पदक), चित्रकला – ज्ञानेश्वर साठे (रौप्य पदक), फोक ऑर्केस्ट्रा – द्वितीय (रौप्य पदक), यात अमित वाघमारे अनमोल कांबळे सार्थक जोगदंड यशवंत कातळे ओंकार भंडारे, तसेच , राम पांचाळ, सुमित घाडगे, गायत्री बेडजवळगे, शीतल सगर यांनी यश संपादन केले. सूरवाद्य – सुमित घाडगे (कांस्य पदक), शास्त्रीय नृत्य – वेदिका साळुंके (कांस्य पदक), पोस्टर मेकिंग – ज्ञानेश्वर साठे (कांस्य पदक), रांगोळी – निलेश झिरमिरे (कांस्य पदक) यांनी यश प्राप्त केले. अशा प्रकारे एकूण पारितोषिके ११ पारितोषिके प्राप्त केली.

दयानंद कला महाविद्यालयाचा अभिमान ‘ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात’ पुन्हा एकदा झळकला आहे.
या यशामागे संस्कृतिक विभागाचे प्रभारी डॉ. संतोष पाटील, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, तसेच डॉ. संदीपान जगदाळे, प्रा शरद पाडे, प्रा. विजय मस्के, प्रा. सूरज साबळे, प्रा. हरी कुंभार, प्रा. जिमी शिरोळे, प्रा. ज्योतिबा बडे, राहुल भालेराव, संजय जांभळधरे, प्रा. अरेफ शेख, रुपाली पाटील, प्रा. अरुण धायगुडे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी,

उपाध्यक्ष मा. रमेशकुमार राठी, सचिव मा. रमेशजी बियाणी, कोषाध्यक्ष मा. संजयजी बोरा, संयुक्त सचिव मा. विशालजी लाहोटी व मा. विशाल अग्रवाल, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड,उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे,पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित आणि कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी डॉ. नागरगोजे व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

दयानंद कला महाविद्यालयाने सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे!

