• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

*आपली परंपरा जोपासण्यासाठीचे अद्भुत समर्पण*

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
October 26, 2025
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ना किर्तनाचे शिक्षण ना संगिताचे धडे गिरवलेले पण किर्तन भुषण पदवीने सन्मानित ह.भ.प. रामदास शास्ञी चाकूरकर*

अभय मिरजकर

कधी तरी किर्तन ऐकले एवढ्यापुरताच किर्तनाचा संबंध आलेला, गाणी ऐकलेली एवढाच संगीताचा संबंध आलेला, असे असताना आपल्या पुर्वजांच्या चालत आलेल्या परंपरेची जोपासना करण्यासाठी, त्यांचे साहित्य सर्वांसमोर आणण्यासाठी चाकूर येथील रामदास भानुदास शास्ञी यांनी केलेले कार्य एखाद्या नाटक अथवा चिञपटातील कथानकाप्रमाणे किंवा एखाद्या परिकथेतील गोष्टी प्रमाणेच वाटते. तीन वर्षांच्या काळात तब्बल १४३ नारदीय किर्तन तर केलेच पण किर्तन भुषण पुरस्काराने गौरवण्यातही आले.  महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणी किर्तन सेवा करता आली हे आपले भाग्यच आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद अशी कृतज्ञतेची भावना ही रामदास शास्ञी चाकूरकर हे व्यक्त करतात.

चाकूर येथे १८१० ते १८७५ या कालावधीत विठ्ठल शास्ञी महाराज उपाख्य विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज हे संत होऊन गेले. त्यांनी भागवत संहिता वाचन परंपरा आणि नारदीय किर्तन परंपरा पाळली.
मराठी साहित्यातील मध्ये वामन पंडित, मोरोपंत,  रघुनाथ पंडित यांच्यासोबत संत चुडामणी सुत  विठ्ठल शास्त्री महाराज यांचे नाव पंत कवींच्या संदर्भात घेतले जाते. विठ्ठल शास्त्री यांचे काव्य हे पंत काव्य,  तंत काव्य आणि संत काव्य या तीन प्रकारात मोडणारे आहे.


           या घराण्यात जन्माला आलेले रामदास भानुदास शास्ञी चाकूरकर यांनी १९८४ मध्ये विद्युत पदविका घेतली. १० वर्ष औद्योगिक क्षेत्रात काम केले . जपान येथे प्रशिक्षण घेतले व तब्बल २२ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात उपकरणांची विक्री व दुरुस्तीचे काम केले.

*२०० वर्षांची नित्य भागवत संहिता वाचन परंपरा*

शास्त्री ज्यांच्या मठामध्ये २०० वर्षांपासूनची नित्य भागवत संहिता वाचन परंपरा सुरू आहे. भागवत संहिता वाचन परंपरा वडीलांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रामदास शास्ञी यांनी पत्करली. केवळ रामरक्षा पठणा पुरताच रामदास शास्ञी यांचा संबंध आलेला होता. भागवत संहिता वाचन कसं जमणार हा मुख्य प्रश्न होता. बाहेरून कोणी भागवतकार यायला तयार नव्हता. शेवटी वडीलांनी आदेश दिला तुच भागवत संहिता वाचन कर व भागवत सांग. तब्बल एक महिना भागवत कथा सांगण्याचे काम त्यांनी केले.
विठ्ठल शास्त्री महाराज यांनी लिहिलेली २५ आख्याने असणारी वही वडीलांनी हातात दिली व नारदीय किर्तन परंपरा पुढे चालवावी असे सांगितले.


           विठ्ठल शास्त्री महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी रामदास शास्ञी यांनी ही नारदीय किर्तन परंपरा पुढे सुरू केली. फक्त कधी तरी  किर्तन ऐकलेले व हिंदी , मराठी गाणी ऐकलेली एवढाच संगीताचा संबंध आलेला होता. ना किर्तनाचे शिक्षण घेतलेले ना संगिताचे धडे गिरवलेले. परंतु थेट गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त परभणी येथे गालव्य आख्यानावर पहिले नारदीय किर्तन केले आणि ही परंपरा पुढे चालू झाली. श्री क्षेत्र पंढरपूर, शिर्डी, औंढा नागनाथ, सज्जनगड, श्री क्षेत्र गोंदवले, पुणे येथील १४१ वर्षांची जुनी संस्था असलेल्या नारद मंदिरात, भारतीय किर्तन संस्था दादर, श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री शंकराचार्य करवीर पीठ अशा ठिकाणी किर्तन सेवा करता आली.
      २७ अक्टोंबर २०२५ रोजी श्री विठ्ठल शास्त्री महाराज यांची १५१ वी पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या पुर्वी १५० ठिकाणी नारदीय किर्तन करण्याचा संकल्प रामदास शास्ञी चाकूरकर यांनी केला होता. १५१ वे किर्तन उत्सवाच्या काळात करण्याचा संकल्प केला व तो सिध्दीस जात  आहे.
      रामदास शास्ञी चाकूरकर यांनी परभणी येथील आकाशवाणी केंद्रावर १२ भागांमध्ये भागवत कथा सांगितली. पंत कवी विठ्ठल शास्त्री महाराजांच्या साहित्याची ओळख यावर १० भागांमध्ये माहिती दिली. २०२५ मध्ये झालेल्या किर्तन संमेलनातही त्यांना किर्तन सेवा करण्याचा मान मिळाला व त्यांना किर्तन भुषण ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Previous Post

🪔 फराळाच्या थाळीपलीकडचा दिवा…

Next Post

संविधान, सद्भावना आणि लोकशाहीच्या रक्षणार्थएक पाऊल गांधींसोबत (शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कृतिशील सहभाग)

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

संविधान, सद्भावना आणि लोकशाहीच्या रक्षणार्थएक पाऊल गांधींसोबत (शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कृतिशील सहभाग)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved