
लातूर प्रतिनिधी :
लातूर शहरातील प्रसिद्ध देशिकेंद्र विद्यालय सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहे. महाराज देशिकेंद्र स्वामींनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नि:स्वार्थ भावनेने दिलेली जागा आणि संस्थेची प्रतिष्ठा, काही भ्रष्ट हातांनी लुटून खाल्ली असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावर आता एसआयटी (विशेष तपास पथक) सक्रिय झाल्याने लातूरच्या शिक्षणवर्तुळात खळबळ उडाली आहे.
विशेष बाब म्हणजे – शाळेची इमारत मुदत संपण्यापूर्वीच आणि कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय पाडण्यात आली. या निर्णयामागे नेमकी कोणाची संमती होती? हा प्रश्न शिक्षण विभागालाच नाही तर स्थानिक प्रशासनालाही अडचणीत आणणारा ठरत आहे.

💼 नियुक्त्यांचा बाजार आणि ‘बॅकडेट’ चा खेळ
तपासणीसाठी पुढे आलेल्या कागदपत्रांनुसार, संस्थेने बनावट ठराव, खोट्या जाहिराती आणि बॅकडेट नियुक्त्यांचा वापर करून शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदांवर स्वतःच्या लोकांना बसवले, असा आरोप आहे.
त्यात सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे अपूर्वा मुसळे. २०२२ मध्ये तिला क्लार्क पदावर बॅकडेट नियुक्ती देण्यात आली.
👉 ती एकही दिवस शाळेत हजर नसतानाही तिचा पगार नियमितपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे.
👉 शैक्षणिक पात्रता, टायपिंगच्या परीक्षा, उपस्थिती नोंदी याबाबत शाळेकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

🚨 शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचेही हात काळे?
प्रकरणातील गंमत म्हणजे — या शाळेतील नियुक्त्यांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातेवाईक सुद्धा लाभार्थी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यात शिक्षणाधिकारी नागेश मापारी,उपसंचालक मोरे, मठपती, हागवणे, ढाकणे यांच्या नावे चर्चेत आहेत.
या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना बॅकडेटेड नियुक्त्या, तत्काळ मान्यता आणि शालार्थ मिळाल्याने “विभागातलेच लोक या भ्रष्ट साखळीत आहेत का?” असा सवाल उपस्थित झाला आहे.
📑 ठराव खोटे, जाहिराती बनावट, आणि पोषण आहाराची लूट
संस्थेचे सर्व ठराव हे बनावट असल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणात ठरावच अस्तित्वात नाहीत.
शाळेच्या नियुक्त्यांच्या जाहिराती पाच-दहा स्थानिक पेपरमध्ये मागे वळून छापल्या गेल्या असल्याचा दावा आहे.
😡 दलाली, दबाव आणि गैरवापर
शाळेतील काही महिला कर्मचारी यांनी गुप्तपणे सांगितले की, शाळेतील दलाल shishk आणि काही अधिकारी मिळून दलालीद्वारे नोकऱ्या आणि मान्यतांच्या बदल्यात आर्थिक व्यवहार करत होते.
काहींवर दबाव आणून वैयक्तिक गैरफायदा घेण्याचे प्रकार झाल्याचाही गंभीर आरोप झाला आहे.
🕵️♀️ एसआयटीची नोंद आणि पुढील कारवाई
या सर्व प्रकाराची सविस्तर तक्रार राज्य शासनाकडे पोहोचली असून, एसआयटीने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ज्यांनी फायद्यासाठी कागदपत्रे बनवली, खोट्या नियुक्त्या मंजूर केल्या, किंवा अधिकाऱ्यांच्या नातेसंबंधाचा गैरवापर केला — अशा सर्वांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
लातूरच्या शिक्षणव्यवस्थेला सन्मान आणि पारदर्शकता परत मिळवण्यासाठी या तपासाचा निकाल निर्णायक ठरणार आहे.

देशिकेंद्र महाराजांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता दिलेली भूमी आज भ्रष्टाचाराच्या सावटाखाली गेली आहे. शिक्षणाच्या मंदिरात चाललेली ही दलाली थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे हीच वेळेची गरज आहे.

