आ. कराड यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश
लातूर दि.११- लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडीवस्तीत होत असलेल्या विविध विकास कामांना प्रेरित होऊन लातूर तालुक्यातील मौजे बिंदगीहाळ येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच पूनम कांबळे, उपसरपंच सूर्यकांत शिंदे यांच्यासह शेकडो जणांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपाचे नेते रमेशआप्पा कराड यांना विजयी करून मतदारांनी नवा इतिहास घडविला. तेव्हापासून संपूर्ण मतदार संघातील गावागावात शासनाच्या विविध विभागामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने अनेक विकास कामाना गती मिळाली. होत असलेल्या विविध कामांना प्रेरित होऊन अनेक जण भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करीत आहेत.
लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात मंगळवारी लातूर तालुक्यातील मौजे बिंदगीहाळ येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडोजनांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून या प्रवेशामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या भातांगळी जिल्हा परिषद आणि बोरी पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे बळ वाढण्यास मोठी मदत होणार आहे. भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत लातूर तालुक्यातील मौजे बिंदगीहाळ येथील प्रवेश प्रसंगी भाजपाचे मंडलाध्यक्ष प्रताप पाटील, सुरज शिंदे, विजयकुमार मलवाड, सुरेश पाटील, महादेव साळुंके, पांडुरंग बालवाड, हनुमंत गव्हाणे, आदिनाथ मुळे, मारुती शिंदे, सचिन साबदे, संजय सावंत, तुकाराम शिंदे, राम शेंडगे यांच्यासह इतर अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिंदगीहाळ येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच पुनम बाळू कांबळे, उपसरपंच सूर्यकांत शिंदे ग्राम सदस्य कमल सावंत, ओया मांजरे, माजी व्हा. चेअरमन भाऊसाहेब शिंदे, विठ्ठलराव सावंत, सत्यभामा शिंदे, जनाबाई शिंदे, कानिकबाई टेकाळे, कालींदाबाई शिंदे, सुभद्राबाई सावंत, पुष्पाबाई सावंत, अशांतबाई सूर्यवंशी, केवळबाई सावंत, सुभद्रा काळे, वर्षा शिंदे, गणेश कांबळे, अरविंद सुरवसे, ताजुद्दीन शेख, शफी शेख, राजकुमार शिंदे, गोविंद सूर्यवंशी, रामेश्वर सावंत, दत्तू चित्ते, लिंबराज शेंडगे, बलभीम शेंडगे, प्रल्हाद सूर्यवंशी, गोविंद काळे, प्रताप सावंत, सुभाष सावंत, बबन शेंडगे, सोपान सूर्यवंशी, बालाजी सावंत, सुदर्शन सावंत, ज्ञानोबा सूर्यवंशी, गणपत शिंदे निवृत्ती सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना आ. कराड यांनी भारतीय जनता पार्टीत सर्वांचे स्वागत करून प्रत्येकाला मान सन्मान दिला जाईल. बिंदगीहाळ गावच्या विकासासाठी येत्या काळात निश्चितपणे विविध योजना राबवण्यासाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.

