• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारासाठीज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांची निवडलातुरात २१ डिसेंबर रोजी वितरण समारंभ

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
December 15, 2025
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर, दि. १५ (प्रतिनिधी) पुरोगामी व क्रांतीकारी समाजवादी नेते मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कार यंदा सर्वोच्च न्यायाल‌यातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना प्रदान केला जाणार आहे. माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने काल ही घोषणा केली. पुरस्कार वितरण समारंभ लातूर येथे रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. तसेच या समारंभात प्रशांत भूषण ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान देतील.
मनोहरराव गोमारे पुरोगामी विचारमंच, लातूर तर्फे हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी पुरस्काराचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी स्वराज हंडियाचे संयोजक व भारत ओडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पन्नास हजार, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून मनोहरराव गोमारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तो दिला जातो.
प्रशांत भूषण हे भारतातील सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता, लेखक, सामाजिक आणि जनहित याचिका (पीआयएल) लढवणारे प्रसिद्ध व सार्वजनिक हिताचे वकील आहेत. ते भ्रष्टाचार, राजकीय आणि प्रशासकीय दुरुपयोग, पर्यावरणीय समस्या आणि नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्यांचा कायदेशीर आवाज म्हणून ओळखले जातात. ते ‘भारत विरोधी भ्रष्टाचार चळवळी’तील मुख्य सदस्य होते आणि अण्णा हजारे यांच्या जन लोकपाल विधेयक चळवळीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टी चा आधार घेतला पण नंतर त्यांनी पक्षाचा मार्ग आणि निर्णय यावर टीका केली. प्रशांत भूषण हे ‘न्यायालयाची पारदर्शकता वाढवावी’ अशी त्यांची भूमिका ते जोरात मांडत आहेत आणि लोकशाहींमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नागरिक अधिकार यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे, यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे.
लातुरचे वैचारिक नेतृत्व केलेले अ‍ॅडव्होकेट मनोहरराव गोमारे यांचे २० डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. ते महाराष्ट्राचे पुरोगामी, क्रांतिकारी आणि समाजवादी नेते होते. थोर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी राजकारण सुरू केले. ते शेवटच्या दिवसापर्यंत पुरोगामी, क्रांतिकारी विचारसरणीत राहिले. ते लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांनी सामान्य लोकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. एस. टी. चळवळीदरम्यान त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांना अटक करून १९ महिने नाशिक तुरुंगात ठेवण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते शेवटपर्यंत पदाधिकारी होते. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी पाच वेळा आणि खासदारपदासाठी दोनदा निवडणूक लढवली आहे. ते एक संघर्षशील कार्यकर्ते होते.
माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने काल एकमताने ॲड. प्रशांत भूषण यांची निवड केली. निवड समितीमध्ये सर्वश्री प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, माधव बावगे प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, शिवाजी शिंदे, उदय गवारे, सूर्यकांत वैद्य, डॉ. बी. आर. पाटील
दिलीप आरळीकर, श्याम जैन, डॉ. कोमल गोमारे, ॲड. विश्वास मोमले, डॉ. गणेश गोमारे यांचा समावेश आहे.

Previous Post

घाटनांदूर येथे आंतरभारतीची स्थापनाअध्यक्षपदी डॉ. सुलभा पाटील तर सचिवपदी रमेश मोटे यांची निवड

Next Post

🔥 भाऊच निघाला शेतकऱ्याचा शत्रू! साई गावात उसाला आग लावून अडीच लाखांचे नुकसान 🔥

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

🔥 भाऊच निघाला शेतकऱ्याचा शत्रू! साई गावात उसाला आग लावून अडीच लाखांचे नुकसान 🔥

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

May 10, 2026

Recent News

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

May 10, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved