
लातूर | प्रतिनिधी
लातूर शहरात भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा खरा चेहरा उघडा पडू लागला आहे.
लातूर शहराच्या आमदार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर पोस्टर लावून शुभेच्छा देणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना हेरून थेट तिकिट कापण्याची कारवाई केल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
या प्रकारामुळे लातूर शहरातील जुने-नवे, निष्ठावान आणि मेहनती भाजप कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले असून, पक्षाच्या या गलथान, सूडबुद्धीच्या आणि आत्मघातकी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
🔴 प्रश्न अर्चनाताईंवर नाही, प्रश्न डावलण्यावर आहे
लातूर शहरात भाजपला
✔ इतिहासात कधी नव्हे एवढे मतदान
✔ संघटनात्मक ताकद
✔ जनाधार आणि विश्वास
हे सर्व अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वामुळे मिळाले, हे वास्तव असताना
लातूर महानगरपालिका निवडणुकीचा कारभार ‘उपऱ्या च्या’ हाती का?
हा सवाल आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जात आहे.
🔍 जिल्ह्यात नगर परिषद मध्ये अर्चना ताईने समर्थकांना निलंगा औसा रेणापूर येथे तिकिटे वाटली का – मग हा दुजाभाव कशासाठी?
नुकत्याच झालेल्या
निलंगा, औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर
या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये —
❓ किती उमेदवारांची तिकिटे
❓ कुठल्या मतदारसंघात
❓ कोणाच्या सल्ल्याने
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विचारून देण्यात आली?
मग प्रश्न असा उभा राहतो की —
जिल्ह्यात मान्य, शहरात अमान्य का?
शहरातील कार्यकर्त्यांचे राजकीय अस्तित्व एवढे स्वस्त का?
⚠️ पक्ष नेतृत्वाने वेळीच दखल घेतली नाही तर…
लातूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा आहे —
“वेळीच निर्णय बदलला नाही,
कारभार अर्चनाताईंच्या हाती दिला नाही,
तर लातूर महानगरपालिका भाजपच्या हातातून जाण्याचा धोका अटळ आहे.”
ही नाराजी कुजबुज नाही,
ही बंडाची चाहूल आहे.
📢 हाय कमांडने डोळ्यात अंजन घालावे!
ही बातमी अफवा नाही,
हा इशारा आहे.
लातूरच्या राजकारणाचा थंड डोक्याने हिशोब मांडणारा, पण तापलेला आवाज आहे.
भाजप नेतृत्वाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही,
तर पोस्टर लावणारे कार्यकर्ते नव्हे —
पक्ष स्वतःच कटघऱ्यात उभा राहील.

