• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

कोकणातील गणपतीचे पहिले पाऊल

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
January 4, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभय मिरजकर


महाराष्ट्रात निसर्गरम्य परिसर म्हणजे कोकण म्हटले जाते. याच कोकणात गणपतीचे पहिले पाऊल पडले ते आंजर्ले या गावी. ज्यामुळे येथील कड्यावरचा गणपती प्रसिद्ध झाला आहे. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून ते विकसित झाले आहे.
महाराष्ट्रातील कोकण म्हणजे देवभूमी म्हटले जाते. नारळ, सुपारी, आंबा, काजूची झाडे असा मनमोहक निसर्गरम्य परिसर, अथांग समुद्र, स्वच्छ समुद्रकिनारे यामुळे पर्यटनासाठी सर्वात प्रथम पसंती असते ती कोकणलाच. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पासून जवळच असलेले निसर्गरम्य परिसर असणारे गणपतीचे मंदिर म्हणजे आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती होय.


कोकणात गणपतीचे पहिले पाऊल पडले ते हे ठिकाण असे ही सांगितले जाते. डोंगर माथ्याच्या कडेवर गणपतीचे पहिले पाऊल पडले आणि दुसरे पाऊल मंदिरात पडले अशी अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे कड्यावरचा गणपती हे मंदिरास नाव पडले आहे. गणपतीचे पाऊल असेच अधिकतर या ठिकाणास म्हटले जाते. हे मंदिर हे १२ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिरातील उजव्या सोंडेची काळ्या पाषाणातील मूर्ती लक्षवेधी आहे. येथील गणपती जागृत देवस्थान आहे असे म्हणतात. श्री गणेशाची सुबक आणि देखणी मूर्ती आहे. सुमारे साडेतीन ते चार फुटांची ही मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धीसिद्धीच्या मूर्ती पण आहेत.
पुर्वी हे गणपती मंदिर समुद्राच्या काठावर होते. समुद्राच्या पाण्यात मंदिर गेले नंतर ते टेकडीवर बांधण्यात आले असेही सांगितले जाते. दापोलीच्या जवळचे प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक म्हणजे आंजर्ले बीच, जवळपास दोन किलोमीटर चा पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा या ठिकाणी पाहण्यास मिळतो.


येथे दरवर्षी कासव महोत्सव पण भरवला जातो. मंदिराच्या परिसरातुन समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. मंदिरातून आजूबाजूच्या नारळ आणि सुपारीच्या झाडांचे विहंगम दृश्य दिसते, जवळचा सुवर्णदुर्ग किल्ला, अरबी समुद्र आणि आजूबाजूच्या टेकड्या देखील मंदिरातून पाहता येतात. मंदिरासमोर एक तलाव आहे जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात माशांना आणि कासवांना खायला घालण्यासाठी येतात. मोठ्या प्रमाणात कासव येथे पाहण्यास मिळतात.

Previous Post

निष्ठावंतांना डावलून आयात संस्कृतीचा उदोउदो : लातूर भाजपाच्या संघटनात्मक आत्म्यावर घाव

Next Post

सेटिंगच्या राजकारणाचा नवा अध्याय : देशमुखांच्या डावपेचात प्रकाश आंबेडकर अडकले का?

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

सेटिंगच्या राजकारणाचा नवा अध्याय : देशमुखांच्या डावपेचात प्रकाश आंबेडकर अडकले का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved