• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

लातूर महानगरपालिका निवडणूक : भाजपातील गोंधळ, निष्ठेचा अपमान आणि कार्यकर्त्यांच्या संयमाची अखेरची परीक्षा

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
January 5, 2026
in Blog
0
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर शहर महानगरपालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया नाही; ती भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक प्रामाणिकतेची, वैचारिक निष्ठेची आणि रस्त्यावर झिजलेल्या कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाची निर्णायक कसोटी आहे. मात्र या निवडणुकीत जे काही घडले, ते पाहता “शिस्त, संघटना आणि विचार” या भाजपाच्या मूलमंत्रालाच सुरुंग लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याची भावना लातूरच्या जनमानसात तीव्रपणे उमटत आहे.

तिकीट वाटप नव्हे, तर बाजारपेठ उघडली गेली!

महानगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटप ही संघटनात्मक निकषांवर आधारित, पारदर्शक प्रक्रिया असायला हवी होती. पण प्रत्यक्षात येथे निकष नव्हते, शिस्त नव्हती, फक्त ‘सेटिंग’ होती. जाणीवपूर्वक गोंधळ घालून, निष्ठेपेक्षा आर्थिक समीकरणांना महत्त्व दिल्याचे आरोप आता दबक्या आवाजात नव्हे, तर उघडपणे बोलले जात आहेत.
तीन दशकांपासून पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते बाजूला फेकले गेले आणि काल-परवा पक्षात आलेल्या, भाजपाच्या विचारधारेचा गंधही नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी बहाल करण्यात आली. हा निर्णय नाही, हा कार्यकर्त्यांच्या घामावर मारलेला फटका आहे.

१,०६,००० मतांची ताकदही अपुरी ठरते?

विधानसभा निवडणुकीत तब्बल १,०६,००० मते मिळवून जनतेशी थेट नातं सिद्ध करणाऱ्या, संघटनात्मक ताकद दाखवून देणाऱ्या सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना संपूर्णपणे डावलले जाते — आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम करणाऱ्यांना तिकीटे दिली जातात.
हा राजकीय निर्णय नसून, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निर्लज्ज प्रकार आहे.

‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीला अधिकृत मान्यता

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण लातूरमध्ये कुठलाही प्रभाग, कुठलाही उमेदवार, कुठलाही निकष — अशी अवस्था निर्माण झाली आहे. काल काँग्रेस, आज भाजपा आणि उद्या कुठेही — अशा आयाराम-गयाराम प्रवृत्तीला अधिकृत उमेदवारी देणे म्हणजे पक्षाच्या वैचारिक पायालाच सुरुंग लावण्यासारखे आहे.

सामाजिक समतोलाचा बळी

“अठरा पगड जातींचा पक्ष” हा केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित राहतो की काय, असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे.
ओबीसी समाज, तसेच साळी, माळी, कोळी, ब्राह्मण, मारवाडी, कोष्टी, वंजारी, लिंगायत समाजाला त्यांच्या लोकसंख्या व संघटनात्मक योगदानाच्या तुलनेत जाणीवपूर्वक कमी प्रतिनिधित्व देण्यात आले. हा केवळ अन्याय नाही, तर पक्षाच्या मुळांवर घाव घालणारा निर्णय आहे.

कार्यकर्त्यांचा संयम संपत चालला आहे

१९९० पासून उन्हात-पावसात झेंडा खांद्यावर घेऊन उभे राहिलेले कार्यकर्ते आज एकच प्रश्न विचारत आहेत —
“आमची चूक काय?”
तिकीट म्हणजे केवळ निवडणूक लढवण्याचा अधिकार नसतो, ती कार्यकर्त्यांच्या त्यागाची पावती असते. आणि तीच पावती आज अनेकांच्या हातून हिसकावून घेतली गेली आहे.

प्रश्न विचारणाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता!

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पक्षातील गोंधळाबाबत केवळ प्रश्न विचारणाऱ्या गरीब, सर्वसामान्य ओबीसी, लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, साळी, माळी, कोष्टी, वंजारी समाजातील कार्यकर्त्यांना पक्षातून काढले जात आहे.
“आपण पक्षाचे मालक आहोत” अशा थाटात वागणाऱ्यांनी भाजपाला खाजगी जहागीर समजले आहे काय, असा सवाल आज लातूरकर विचारत आहेत.

वेळीच दखल घेतली नाही, तर परिणाम अटळ

लातूर महानगरपालिका निवडणुकीतील हा असंतोष म्हणजे इशारा आहे — आणि तो दुर्लक्षित केला तर त्याचे परिणाम मतदान पेटीतून दिसतील.
वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने:

तिकीट वाटपाची निष्पक्ष चौकशी करावी

आर्थिक व्यवहारांचे आरोप गांभीर्याने तपासावेत

निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा

आणि भाजपाची मूळ विचारधारा पुनर्स्थापित करावी

सुजाण लातूरकरांनो, सावध रहा!

ही केवळ निवडणूक नाही, ही पुढील पाच वर्षांची दिशा आहे.
आज जर डोळे झाकून मतदान केले, तर उद्या पश्चात्तापाशिवाय पर्याय उरणार नाही.
म्हणून सद्सद्विवेक बुद्धी वापरा, विचार करा आणि लक्षपूर्वक मतदान करा —
कारण चुकीचा निर्णय केवळ पक्षालाच नव्हे, तर संपूर्ण लातूर शहरालाही महागात पडू शकतो.

  • विवेकी विचार..,लातूर
Previous Post

सेटिंगच्या राजकारणाचा नवा अध्याय : देशमुखांच्या डावपेचात प्रकाश आंबेडकर अडकले का?

Next Post

🔥 विवेक विध्याभूषण बाजपेई भाजप चा आहे भाजपचाच राहणार…

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

🔥 विवेक विध्याभूषण बाजपेई भाजप चा आहे भाजपचाच राहणार…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved