

लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी काँग्रेसच्या जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांची तर उपमहापौरपदी ॲड.स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड आज झाली. निवडीच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेस चे दोन्ही महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार झाली बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले… या निवडी नंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लातूर शहर महानगरपालिके समोर फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत आपला आपला आनंद उत्सव साजरा केला…

काँग्रेस आणि वंचित च्या वतीने महानगरपालिका निवडणुका एकत्रितपणे आघाडी करून लढवीण्यात आल्या होत्या, परंतु काही कारणास्तव वंचितच्या नवनिर्वाचित उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आज शेवटच्या दिवसापर्यंत लातूर शहर महानगरपालिकेचा महापौर बिनविरोध होणार का निवडणुका होणार याबद्दल सर्वांचे उत्सुकता लागली होती. परंतु शेवटी वंचितच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे काँग्रेसच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली…

