• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 24, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

• अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा

लातूर, दि. २४ : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. गॅस वितरणाबाबत पारदर्शकता राखावी आणि कोणत्याही परिस्थितीत अवैध विक्री होणार नाही यावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

लातूर जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक आणि सेल्स ऑफिसर्सची बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गरजू आणि पत्र ग्राहकांनाच गॅसचा पुरवठा व्हावा, यासाठी एका गॅस कनेक्शनधारकाला २५ दिवसांच्या आत दुसरे सिलिंडर देण्यात येऊ नये. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना १०० टक्के घरपोच डिलिव्हरी देण्यात यावी. वितरकांनी ‘फिफो’ आणि ओटीपी प्रणालीचा वापर करून घरपोच सेवा देणे अनिवार्य आहे. ग्राहकांना एजन्सी किंवा गोदामावर बोलावू नये. तेल कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडून आकारू नये. गॅस एजन्सी ठरलेल्या वेळेतच सुरू व बंद ठेवाव्यात, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. गॅस सिलिंडरचे चुकीच्या पद्धतीने वितरण किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास, संबंधित वितरकावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

गॅस सिलिंडरची दैनंदिन मागणी आणि पुरवठा यांची माहिती जिल्हा प्रशासनास दररोज कळवणे बंधनकारक राहील. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना पूर्ण सहकार्य करून रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नागरिकांनी गॅस टंचाईबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घाबरून जाऊन सिलिंडरची अनावश्यक साठवणूक करू नका. प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
***

Previous Post

मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार

Next Post

‘बोन्शाही’चा राज्यस्तरीय ठसा — अभय कुलकर्णी यांच्या लेखनाला तृतीय पारितोषिक

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

‘बोन्शाही’चा राज्यस्तरीय ठसा — अभय कुलकर्णी यांच्या लेखनाला तृतीय पारितोषिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देविदास काळेंनी घेतला मनपा विरोधी पक्ष नेत्याचा पदभार

March 25, 2026

पोलीस स्टेशनमध्येच अमानुष अत्याचार — वडार तरुणासं मारहाण, पोलिसावर एफ. आय. आर कधी…!

March 25, 2026

कलाविष्कारांनी “कलातीर्थ २०२६” वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

March 25, 2026

‘बोन्शाही’चा राज्यस्तरीय ठसा — अभय कुलकर्णी यांच्या लेखनाला तृतीय पारितोषिक

March 24, 2026

Recent News

देविदास काळेंनी घेतला मनपा विरोधी पक्ष नेत्याचा पदभार

March 25, 2026

पोलीस स्टेशनमध्येच अमानुष अत्याचार — वडार तरुणासं मारहाण, पोलिसावर एफ. आय. आर कधी…!

March 25, 2026

कलाविष्कारांनी “कलातीर्थ २०२६” वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

March 25, 2026

‘बोन्शाही’चा राज्यस्तरीय ठसा — अभय कुलकर्णी यांच्या लेखनाला तृतीय पारितोषिक

March 24, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देविदास काळेंनी घेतला मनपा विरोधी पक्ष नेत्याचा पदभार

March 25, 2026

पोलीस स्टेशनमध्येच अमानुष अत्याचार — वडार तरुणासं मारहाण, पोलिसावर एफ. आय. आर कधी…!

March 25, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved